घरठाणेखारघरमधील फिजिक्स, कोअर जिम सील; नियमबाह्य सुरू केल्याने पनवेल मनपाची कारवाई

खारघरमधील फिजिक्स, कोअर जिम सील; नियमबाह्य सुरू केल्याने पनवेल मनपाची कारवाई

Subscribe

राज्य शासनाने अध्यापही जिम सुरू करण्यास परवानगी दिली नसताना पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघरमध्ये काही जिम मालकांनी नियमबाह्य जाऊन जिम सुरू केल्या. मात्र, याबाबत पनवेल महापालिका प्रशासनाला माहिती मिळताच गुरुवारी रात्री खारघर मधील दोन जिम सील करण्यात आला. खारघर डेली बाजार येथील फिजिक्स जिम आणि खारघर हिरानंदानी जवळलील कोर जिमचा समावेश आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. आता शासनाने मिशन अन लॉक सुरू केले आहे. मात्र, अध्यापि जिम सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही. राज्यातील अनेक जिम असोसिएशन आणि जिम संघटनांनी जिम सुरू करण्यासाठी शासनांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. याबाबत लेखी निवेदन देखील दिले आहे. मात्र, अध्यापि शासनाने जिम सुरू करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. पनवेल मनपा क्षेत्रात मात्र काही ठिकाणी जिम सुरू केल्याचे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना दिले.

- Advertisement -

गुरुवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी रात्री पनवेल मनपाच्या खारघर विभाग कार्यालयाने फिजिक्स जिम आणि कोर जिमवर कारवाई केली. खारघरमध्ये आणखी काही जिम सुरू असल्याची माहिती असून याबाबत शोध सुरू आहे. नियमबाह्य सुरू असलेल्या जिमवर तातडीने सील करण्याची कारवाई केली जात असल्याचे खारघर विभाग अधिकारी दशरथ भंडारी यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

दरम्यान, जिम सुरू करण्यास परवानगी देण्याबाबतचा निर्णय शासनाच्या आखात्यारीतला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील चालक, मालक असोसिएशनने जिम सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे. सदर निवेदन पालिकेने राज्यशासनाकडे पाठवले असल्याची प्रतिक्रिया पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली.

- Advertisement -

हेही वाचा –

जयजीत सिंह एटीएस प्रमुख; देवेन भारती सुरक्षा महामंडळावर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -