घरताज्या घडामोडीदिलासादायक : नाशिक जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या पाच दिवसांत 1493ने झाली कमी

दिलासादायक : नाशिक जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या पाच दिवसांत 1493ने झाली कमी

Subscribe

७४८६ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण, दिवसभरात ४९३ बाधित, ७३७ कोरोनामुक्त

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होवू लागला आहे. जिल्ह्यात सोमवारी (दि.१२) दिवसभरात ४९३ नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले तरी २४ तासांत ७३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बाधित रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीण १९१, नाशिक शहर २८०, मालेगाव आणि जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी ११ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ८६ हजार ४ रुग्ण बाधित आढळून आले असले तरी सध्या ७ हजार ४८६ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून उर्वरित ७६ हजार ९८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यात पाच दिवसांत अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या १ हजार ४९३ने कमी झाली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आत्तापर्यंत ३ लाख १ हजार ३९६ संशयित रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ८६ हजार ४ रुग्ण बाधित आणि २ लाख १४ हजार ५ रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात ९० टक्के कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात १० बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिक ग्रामीणमधील सहा आणि नाशिक शहरातील चार रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात ७ हजार ४८६ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण ३ हजार ५२८, नाशिक शहर ३ हजार ५३९, मालेगाव २९५ आणि जिल्ह्याबाहेरील १२४ रुग्ण आहेत. दिवसभरात १ हजार १९१ संशयित विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले. यामध्ये नाशिक महापालिका रुग्णालये १ हजार ९६, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय ८, मालेगाव रुग्णालय १२ आणि नाशिक ग्रामीण रुग्णालय ७५ रुग्ण दाखल झाले.

- Advertisement -

दिवसनिहाय अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या

८ ऑक्टोबर 8979
९ ऑक्टोबर 8760
१० ऑक्टोबर 8396
११ ऑक्टोबर 7740
१२ ऑक्टोबर 7486

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -