घरलाईफस्टाईलभुवया दाट बनवण्यासाठी खास टीप्स

भुवया दाट बनवण्यासाठी खास टीप्स

Subscribe

भुवया दाट करण्यासाठी काय करावे, जाणून घ्या

बऱ्याच जणांना आपल्या भुवया दाट हव्या असतात. कारण भुवया दाट असतील तर चेहरा अधिक आकार्षक दिसतो. मात्र, या भुवया दाट करण्यासाठी काय करावे, हे आज आपण पाहणार आहोत.

एरंडेल तेल

- Advertisement -

भुवया दाट बनविण्यासाठी अर्धा चमचा नारळाचे दूध आणि अर्धा चमचा एरंडेल तेल एकत्र करावे. हे तेल रात्री झोपताना मस्करा लावण्याच्या ब्रशने भुवयांवर लावावे, यामुळे भुवया दाट होण्यास मदत होते.

मेथीदाण्याची पेस्ट

- Advertisement -

भुवया दाट बनविण्यासाठी पाण्यात रात्रभर मेथीचे दाणे भिजवा सकाळी त्या मेथीदाण्याची मिक्सरमध्ये पेस्ट करा. ही तयार पेस्ट भुवयांवर लावा. यामुळे भुवया दाट होण्यास मदत होईल.

बदामाचे तेल

बदामाचे तेल भुवयांना लावल्यामुळे भुवया दाट होतात.

अंड्याचा पिवळा बलक

अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये आढळणारे सिलेनियम भुवया दाट होण्यास मदत करते. अंड्यातील पिवळ बलक आठवड्यातून २ वेळा भुवयावर ५ मिनिटे लावा. त्यानंतर कोमट पाण्याने धुऊन घ्या.

कोरफडीचा गर

कोरफडीचा गर आपल्या भुवईवर लावा. १० मिनिटे सुकू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका, असे नियमित केल्याने भुवया द्रुतगतीने दाट होण्यास मदत होते.

नारळाचं दूध

नारळाचं दूधही कापसाच्या बोळ्याने भुवयांवर लावल्याने फायदा होतो. रात्रभर नारळाचं दूध लावून झोपा. सकाळी चेहरा सामान्यपणे धुवाव.

कांद्याचा रस

कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असतं. यामुळे भुवयांवरील केसांची वाढ होण्यास मदत होते. कापसाच्या बोळ्याने कांद्याचा रस भुवयांवर लावा. १०-१५ मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -