घरदेश-विदेशखासगी सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; दिवाळीपूर्वी येणार सरकारची नवी योजना

खासगी सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; दिवाळीपूर्वी येणार सरकारची नवी योजना

Subscribe

अर्थव्यवस्थेची स्थितीत सुधारण्यासाठी केंद्र सरकार भविष्यातही आवश्यक पावले उचलणार

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने कित्येकाच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे बरेच जण बेरोजगार तर झालेच मात्र या महासाथीमुळे आर्थिक नुकसान होऊन अर्थव्यवस्था कोलमडली. दरम्यान हीच परिस्थिती सुधारण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासोबत मिळून अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुरदेखील नुकसान झालेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

या नव्या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा 

अर्थव्यवस्थेची स्थितीत सुधारण्यासाठी केंद्र सरकार भविष्यातही आवश्यक पावले उचलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते असेही म्हणाले की, लवकरच खासगी सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसाठी LTC (Leave Travel Allowances) लाभावरील चित्र स्पष्ट करण्यात येईल. नुकतेच प्रोत्साहन भत्त्याबाबत त्यांनी सांगितले होते की, गरीब आणि वंचितांना मदत पोहोचविणे ही सरकारची इच्छा आहे. या पॅकेजची घोषणा सध्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असली तरी हा खर्च अशा वस्तूंवर होणार आहे, ज्याचा लाभ छोट्या व्यापाऱ्यांना मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

अनुराग ठाकूर यांनी प्रोत्साहन पॅकेज आणि अर्थव्यवस्थेवर याच्या परिणामाबाबत मोठं चित्र पाहण्याची गरज आहे. यावर टीका तर होणारच. भारत हा एकमेव असा देश आहे, जेथे ८ महिन्यांसाठी ८० कोटी लोकांना मोफत अन्न देण्यात आलं. याशिवाय गरीब वर्गांच्या बँक अकाऊंटमध्ये ६८००० कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहे. याशिवाय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांसाठी अनेक पाऊले उचलण्यात आली आहे, असे टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले.


धक्कादायक! पाच पोलिसांनी तब्बल दहा दिवस पोलीस ठाण्यातच महिलेवर केला बलात्कार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -