घरताज्या घडामोडी'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' कार्यक्रमाच्या परीक्षणाची धुरा 'धर्मेश'कडे

‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ कार्यक्रमाच्या परीक्षणाची धुरा ‘धर्मेश’कडे

Subscribe

नृत्यविश्वातलं एक लोकप्रिय नाव म्हणजे ‘धर्मेश सर’. आपल्या नृत्यानं धर्मेश एका रियालिटी शोमधून प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर त्यानं पुन्हा कधीच मागं वळून पाहिलं नाही. चित्रपट, डान्स शोज करतकरत आज ‘धर्मेश सर’ नृत्यक्षेत्रात यशाच्या आणि प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोहचला आहे. त्याच्या या यशाचं कारण विचारलं असता तो म्हणाला की, ‘त्याच्या आयुष्यात त्यानं चान्स घेतला आणि त्याच्या डान्सला मनापासून सादर केलं म्हणून तो आज इथं आहे.’ अशाच सगळ्या नृत्य कलाकारांसाठी सोनी मराठी वाहिनी घेऊन आली आहे एक चान्स, ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ या कार्यक्रमातून!

 

View this post on Instagram

 

Caption plss

A post shared by D (@dharmesh0011) on

या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून धर्मेश सर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन्स सुरू झाल्या असून सोनी लिव्ह या अॅपवर जाऊन इच्छुक स्पर्धकांनी आपले ऑडिशन व्हिडिओज पाठवायचे आहेत.

 

View this post on Instagram

 

#morjim goa

A post shared by D (@dharmesh0011) on

- Advertisement -

ऑडिशन पाठवण्याची शेवटची तारीख असणार आहे ४ नोव्हेंबर २०२०. आत्ता ऑडिशन प्रक्रिया सुरू असून लवकरच निवडलेले स्पर्धक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांमधल्या डान्सर्सना सोनी मराठी वाहिनीकडून ही सुवर्णसंधी मिळते आहे. तसेच आता लवकरच निवडलेले स्पर्धक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -