घरताज्या घडामोडीठाणे जिल्हा बँक विभाजनाच्या मंत्रालयात हालचाली

ठाणे जिल्हा बँक विभाजनाच्या मंत्रालयात हालचाली

Subscribe

पालघर जिल्ह्याची स्वतंत्र बँक होणार

गेल्या 2014 सालापासून राष्ट्रवादीच्या ताब्यातून भाजपच्या वर्चस्वाखाली असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभाजन करण्याचा प्रस्ताव मंत्रालय पातळीवर अंतिम करण्याच्या हालचाली राज्यातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडी विकास सरकारकडून सुरू आहे. येत्या काही दिवसातच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बरोबरच नव्याने पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा वेगळा व स्वतंत्र करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर पालघर जिल्ह्यात स्वतंत्र सरकारी कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर आता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभाजन करून पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्वतंत्रपणे अस्तित्वात आणण्याचे प्रयत्न राज्यातील महाआघाडी विकास सरकारकडून सुरू झाले आहेत.

- Advertisement -

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये पसरलेली असून बँकेच्या ऐंशीच्या वर शाखा दोन्ही जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळेच ठाणे जिल्हा बँकेचे विभाजन करून पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन करण्याचे प्रयत्न आघाडी सरकारकडून विशेष तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरू झाले आहेत .

नोकर भरतीत भ्रष्टाचार
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेल्या चार ते पाच वर्षांत मोठ्या प्रमाणावर नोकर भरती करण्यात आली आहे. या नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि वशिलेबाजी झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या भ्रष्टाचाराची चौकशी देखील आघाडी सरकारकडून केली जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -