घरदेश-विदेशकृषी कायद्यांवर अदानींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,

कृषी कायद्यांवर अदानींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,

Subscribe

केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेले १२ दिवस दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला ‘भारत बंद’द्वारे शक्तीप्रदर्शन केले. यानंतर केंद्र सरकारने कायद्याद बदल होणार नाही सांगत नवा प्रस्ताव पाठवला. मात्र, केंद्राने पाठवलेला प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळत १४ डिसेंबरला देशव्यापी आंदोलनाची हाक दिली. शेतकरी कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीवर ठाम असून हे कायदे अदानी आणि अंबानी यांच्या फायद्यासाठी असल्याचे आरोप करत आहेत. यावर पहिल्यांदाच अदानी उद्योग समुहाने एक पत्रक जारी करुन पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अदानी समुहाने ‘लोकतंत्र टीव्ही यूट्यूब चॅनेल’ आणि विनय दुबे यांचा उल्लेख करत हे खाटी बातमी पसरवत असल्याचे म्हटले आहे. आम्ही शेतकऱ्यांकडून थेट धान्य विकत घेत नाही आणि त्याचे मुल्यही ठरवत नाही. आम्ही फक्त फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियासाठी गोदामांची देखभाल आणि व्यवस्थापन करतो, असे अदानी समुहाने म्हटले आहे. “किती धान्य या गोदांमांमध्ये साठवण्यात यावे तसेच त्याची किंमत किती असावी हे निश्चित करण्याशी कंपनीची काहीही संबंध नाही आहे. आम्ही फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला केवळ गोदामांची सेवा आणि गोदाम उपलब्ध करुन देतो,” असे कंपनीने ट्विटवरुन जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

आमचा धान्य उत्पादन आणि ते शेतकऱ्यांकडून विकत घेण्यामध्ये तसेच त्याची किंमत ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये काहीच सहभाग नाही आहे, असे अदानी समुहाने म्हटले आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियालासाठी गोदाम बांधणे आणि त्याचे व्यवस्थापन करण्याच्या उद्योगामध्ये अदानी समुह २००५ पासून असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. भारत सरकारकडून निविदा प्रक्रियेमार्फत देण्यात येणाऱ्या कंत्राटानुसारच आम्ही हे काम मिळवत आलेलो आहोत, हे ही कंपनीने नमूद केले आहे.

अशापद्धतीने चुकीची माहिती देणे म्हणजे एका प्रतिष्ठित कंपनीच्या प्रतिष्ठेला धोका निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. या माध्यमातून कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याबरोबरच चुकीच्या पद्धतीने जनमत तयार करणे आणि त्यांच्या भावना दुखावण्याचे काम केले जात आहे, असे म्हणत अदानी समुहाने नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -