घरताज्या घडामोडीGold Price Today: सोने-चांदीचे भाव घसरले, जाणून घ्या आजची किंमत

Gold Price Today: सोने-चांदीचे भाव घसरले, जाणून घ्या आजची किंमत

Subscribe

सोन्याच्या किंमतीत आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. एमसीएक्सवर (MCX) फेब्रुवारीमध्ये वायदे बाजारात सोन्याची किंमत २६० रुपयांहून अधिक होऊन आता ४९ हजार ९० झाली आहे. गेल्या चार दिवसांमधील सोन्यांच्या किंमतीत तिसऱ्यांदा घसरण झाली आहे. चांदीच्या किंमतीत देखील घसरण झाल्याचे दिसत आहे. शुक्रवारी सोन्याची किंमत २१३ रुपये मजबूतीसोबत बंद झाली होती. सोन्याची आज ४९ हजार ५४ रुपये किंमत झाली आहे. यावर्षी सोन्याची सर्वाधिक किंमत ५७ हजार १०० रुपये झाली होती. याच किंमतीचा विचार केला तर सोने आता ७ हजारहून अधिक स्वस्त झाले आहे. सोन्याप्रमाणे चांदीच्या किंमतीत देखील सातत्याने घसरण होत आहे. एमसीएक्सवर चांदी मार्च वायदे बाजारात ३८० रुपये कमजोरीसोबत ६३ हजार ३५० रुपयांच्या आसपास व्यापार सुरू आहे. गेल्या आठवड्यात चांदीच्या किंमतीत किंचित वाढ झाली होती.

दरम्यान आजपासून अमेरिकेत कोरोना लसीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. याचा परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीवर झाला आहे. तसेच सध्या आशिया आणि अमेरिकेतील बाजारात तेजी पाहायला मिळात आहे, याचा पण सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे.

- Advertisement -

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे भाव

चार मेट्रो शहरातील २४ कॅरेट सोन्याच्या किंमत Goodreturns.in च्या माहितीनुसार,

१० ग्रॅम सोन्याची किंमत

- Advertisement -

शहर                  सोन्याची किंमत
दिल्ली                 ५२,५५०
मुंबई                   ४९.२६०
कलकत्ता              ५१,५४०
चेन्नई                  ५०,८२०

चांदीचे भाव

शहर                  सोन्याची किंमत
दिल्ली                  ६३,६००
मुंबई                    ६३,६००
कलकत्ता                ६३,६००
चेन्नई                    ६३,४००


हेही वाचा – फ्लिपकार्ट Poco डेज सेल: स्मार्टफोन घ्या तुमच्या बजेटमध्ये


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -