घरक्रीडाIND vs AUS : फलंदाजांची हाराकिरी; भारताच्या कसोटीतील 'लोएस्ट' धावसंख्येची नोंद

IND vs AUS : फलंदाजांची हाराकिरी; भारताच्या कसोटीतील ‘लोएस्ट’ धावसंख्येची नोंद

Subscribe

भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत आटोपला.

कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक सत्र खूप महत्वाचे असते असे म्हटले जाते. हेच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत दिसून आले. भारताने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात आघाडी घेतली होती. तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात मात्र फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका भारताला बसला. दुसऱ्या दिवसअखेर १ बाद ९ अशी धावसंख्या असणाऱ्या भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत आटोपला. भारताची ही कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी (लोएस्ट) धावसंख्या ठरली. याआधी १९७४ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचा डाव ४२ धावांत संपुष्टात आला होता.

दुसऱ्या दिवसअखेर भारताची दुसऱ्या डावात १ बाद ९ अशी धावसंख्या होती. तिसऱ्या दिवशी सुरुवातीपासून भारताने विकेट गमावल्या. नाईट-वॉचमन म्हणून फलंदाजीला आलेला बुमराह २ धावा करून बाद झाला. यानंतर भारताचे प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा (०) आणि विराट कोहली (४) यांना पॅट कमिन्सने, तर मयांक अगरवाल (९), अजिंक्य रहाणे (०) आणि हनुमा विहारी (८) यांना जॉश हेझलवूडने बाद केले. हेझलवूड आणि कमिन्सने तळाच्या फलंदाजांनाही झटपट माघारी पाठवले. अखेर शमीच्या हाताला चेंडू लागल्याने तो पॅव्हेलियनमध्ये परतला आणि भारताचा दुसरा डाव ९ बाद ३६ धावांवर संपला. त्यामुळे भारताच्या कसोटीतील सर्वात कमी धावसंख्येची नोंद झाली. ऑस्ट्रेलियाच्या हेझलवूडने ५ आणि कमिन्सने ४ विकेट घेतल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -