घरCORONA UPDATEVideo : अमेरिकेत कोरोना लसीचे दुष्परिणाम; डोस घेतल्यानंतर नर्स चक्कर येऊन कोसळली

Video : अमेरिकेत कोरोना लसीचे दुष्परिणाम; डोस घेतल्यानंतर नर्स चक्कर येऊन कोसळली

Subscribe

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लसींच्या आपातकालीन वापरासाठी परवानग्या दिल्या आहेत. मात्र, या लसींचा काही जणांवर वाईट परिणाम होत आहे. याबाबतच्या घटना देखील समोर आल्या आहेत. अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे. अमेरिकेत कोरोना लसीचा डोस द्यायला सुरुवात झाल्यामुळे लोक आनंदी आहेत. दुसरीकडे, आता त्यांना लसीच्या दुष्परिणामाची भीती वाटू लागली आहे. शुक्रवारी नर्समध्ये लसीकरणानंतर दिसणाऱ्या दुष्परिणामांमुळे ही भीती आणखीनच वाढली आहे. लस घेतल्याच्या काही मिनिटांनंतर रुग्णालयाची नर्स मॅनेजर पत्रकार परिषदेत चक्कर येऊन कोसळली.

अमेरिकेत फायझर-बायोएनटेक व मॉर्डना या दोन कंपन्यांच्या लसींना आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली. सुरूवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण केले जात आहे. शनिवारपासून लसीकरणाला सुरूवात झाली आहे. अमेरिकेतील टेनेसी राज्यातील चित्तानुगा रुग्णालयात टिफनी डोव्हर या नर्सला फायझर बायोएनटेकची लसीचा पहिला डोस देण्यात आला. डोस दिल्यानंतर टिफनी या माध्यमांशी बोलत होत्या. दरम्यान, बोलत असतानाच टिफनी यांना चक्कर आल्यासारखे झाले आणि त्या जमीनीवर कोसळल्या.

- Advertisement -

टिफनी अमेरिकेच्या टेनेसी शहरात असलेल्या सीएचआय मेमोरियल रुग्णालयामधून पत्रकार परिषद घेत होत्या. या व्हिडीओमध्ये ती म्हणते की आमचे संपूर्ण कर्मचारी या लसीबद्दल खूप उत्साही आहे. आम्ही कोविड युनिट आहोत, म्हणून माझ्या टीमला प्रथम ही लस वापरण्याची संधी मिळाली. यानंतर, या व्हिडीओमध्ये ती थोडीशी अस्वस्थ दिसू लागते आणि माफ करा, मला चक्कर आल्यासारखे होत आहे, असे त्या म्हणाल्या. टिफनीने इतक्या बोलण्याने आपला तोल गमावला. मिळआलेल्या माहितीनुसार, कोरोना लस घेतल्यानंतर १७ मिनिटांनी टिफनी चक्कर येऊन कोसळल्या.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -