घरक्रीडाEPL : मँचेस्टर युनायटेडचा विजय; लीड्सचा उडवला धुव्वा

EPL : मँचेस्टर युनायटेडचा विजय; लीड्सचा उडवला धुव्वा

Subscribe

मँचेस्टर युनायटेडचा हा १३ सामन्यांत आठवा विजय ठरला.

मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात लीड्स युनायटेडवर ६-२ असा विजय मिळवला. मँचेस्टर युनायटेडचा हा १३ सामन्यांत आठवा विजय ठरला. त्यामुळे २६ गुणांसह ते प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे जेमी वार्डी आणि टोबी आल्डरवायरेल्ड यांनी केलेल्या गोलच्या जोरावर लेस्टर सिटीने टॉटनहॅमला २-० असे पराभूत केले. लेस्टरचे आता १४ सामन्यांत २७ गुण झाले असून त्यांचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. ब्रायटन आणि शेफील्ड युनायटेड यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत संपला. ब्रायटनकडून डॅनी वेलबॅकने, तर शेफील्डकडून जेडन बोगलेने गोल केला.

लीड्सविरुद्धच्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. स्कॉट मॅकटोमनेने दुसऱ्या आणि तिसऱ्या मिनिटाला गोल करत मँचेस्टर युनायटेडला २-० अशी आघाडी मिळवून दिली. तर २० व्या मिनिटाला ब्रुनो फर्नांडेस आणि ३७ व्या मिनिटाला व्हिक्टर लिंडेलॉफ आणखी दोन गोलची भर घातल्याने मँचेस्टर युनायटेडला ४-० अशी आघाडी मिळाली. लियम कूपर आणि स्टुअर्ट डॅलास यांनी केलेल्या गोलमुळे लीड्सने मँचेस्टर युनायटेडची आघाडी कमी केली. मात्र, डॅनियल जेम्स आणि ब्रुनो फर्नांडेसच्या गोलमुळे मँचेस्टर युनायटेडने हा सामना ६-२ असा जिंकला. प्रीमियर लीगमध्ये मँचेस्टर युनायटेडचा हा सलग दुसरा विजय ठरला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -