घरदेश-विदेशमाझ्या स्वप्नपूर्तीपुढे मी कधीच हरलो नाही, NEET उत्तीर्ण करत ६४ व्या वर्षी...

माझ्या स्वप्नपूर्तीपुढे मी कधीच हरलो नाही, NEET उत्तीर्ण करत ६४ व्या वर्षी मिळवला MBBS प्रवेश

Subscribe

किशोर प्रधान हे स्टेट बॅक ऑफ इंडियामध्ये डेप्यूटी मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न अपूरे राहिले होते.

जिवनात शिकलेली कोणतीही गोष्ट कधीच फुकट जात नाही. जिवनाच्या शेवटापर्यंत प्रत्येक माणूस हा शिकतच असतो. शिक्षणाची आवड असलेले अनेक मंडळी आहेत. ओडीसामध्ये राहणाऱ्या बॅकेतून निवृत्ती घेतलेल्या किशोर प्रधान यांची ही गोष्ट काहीशी अशीच आहे. वयाच्या ६४व्या वर्षी बॅकेतून निवृत्त झालेले ओडीसाचे किशोर प्रधान यांनी मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला आहे. मेडिकलची डिग्री घेऊन डॉक्टर बनण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

ओडीसाच्या येथे राहणाऱ्या ६४ वर्षीय किशोर प्रधान हे बॅकेतून निवृत्त झाले आहेत. शिकण्याची जिद्द आणि आवड असल्याने त्यांनी वीर सुरेद्र साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे. मेडिकलच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी NEETची परिक्षाही त्यांनी क्लिअर केली आहे. किशोर प्रधान हे स्टेट बॅक ऑफ इंडियामध्ये डेप्यूटी मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न अपूरे राहिले होते. माझे अपूरे राहिलेले स्वप्न मला पूर्ण करायचे आहे, असे किशोर प्रधान यांनी सांगितले.

- Advertisement -

मी २०१६ ला बॅकेतून निवृत्ती घेतली. त्यानंतर मी मेडिकल एट्रन्स परिक्षेची तयारी करत होतो. इंटरमेडिएट परिक्षेनंतर मी मेडिकल एट्रन्स परिक्षा दिली. माझ्यासाठी ही परिक्षा सोपी नव्हती.NEETच्या परिक्षांसाठी माझे वय २५ वर्षांपेक्षा जास्त होते. २०१८ नंतर प्रधान यांनी पुन्हा एकदा मेडिकल एंट्रन्स परिक्षा दिली. उप न्यायाधिशांनी २५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना NEETची परिक्षा देण्यास परवानगी दिली. किशोर प्रधान हे मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेणारे सर्वात जास्त वय असलेले विद्यार्थी आहेत. मेडिकल शिक्षणाच्या इतिहासातील ही एक वेगळी घटना आहे. मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी कसे असायला पाहिजेत याचे हे सर्वात उत्तम उदाहरण आहे, असे कॉलजचे डिरेक्टर प्रोफेसरांनी म्हटले आहे.

प्रधान यांना पहिल्यापासून डॉक्टर बनण्याची इच्छा होती. मात्र त्यांच्या घरात एकूण पाच भावंडे होती. कुटुंबाच्या जवाबदारीमुळे त्यांना त्या वेळी नाइलाजास्तव बॅकेत काम करावे लागले. मात्र आता निवृत्ती नंतर मी माझे हे स्वप्न पूर्ण करणार आहे, असे प्रधान यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

किशोर प्रधान यांना दोन जुळ्या मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची मुलगीही मेडिकलची विद्यार्थीनी आहे. आपल्या मुलीसोबत त्यांनी २०१६रोजी मेडिकल इंट्रन्स परिक्षेची तयारी सुरू केली. मी माझ्या मुलीला तिच्या अभ्यासात मदत करायचो तेव्हा मला प्रश्न पडायचा आपण मुलीला मदत करतो पण आपणही या परिक्षेची तयारी का करत नाही. माझी पत्नी प्रतिभा ही फार्मासिस्ट आहे. तिने मला यासाठी खूप प्रोत्साहन दिले, असे प्रधान यांनी सांगितले. त्यांच्या एका मुलीचा या वर्षी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर त्यांना MBBS होण्यासाठी मोठी प्रेरणा मिळाली. प्रधान यांची एक मुलगी दंत चिकित्सक आहे. तर मुलगा इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे.

मला जॉब मिळणार नाही हे मला माहिती आहे. परंतु माझ्या शिक्षणातून मला लोकांवर मोफत उपचार करायचे आहेत, असे प्रधान सांगितले आहे. प्रधान यांचे सगळेच कौतुक करत आहेत. त्याचे शिक्षणाप्रति असलेले प्रेम हे नव्या पिढिसाठी नवा आदर्श निर्माण करून देत आहे.


हेही वाचा – नवे वर्ष आव्हानाचे, बाबा वेंगाची भविष्यवाणी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -