घरमहाराष्ट्रकांदा निर्यातीला १ जानेवारीपासून परवानगी

कांदा निर्यातीला १ जानेवारीपासून परवानगी

Subscribe

सप्टेंबर महिन्यात केंद्रसरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. तब्बल ३ महिन्यानंतर आता कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवल्याने कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कांद्याची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासाायक बातमी आहे. कांदा निर्यातीसंबंधात केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी आता उठवली आहे. येत्या १ जानेवारीपासून कांदा निर्यातीवर असलेल्या नियमांवरील बंदी हटवण्यात आली आहे. केंद्र सरकारने याबाबत निर्णय दिला आहे. केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यात कांदा निर्यातीवर बंदी घातली होती.  कांदा निर्यातीवर बंदी घालणारे परिपत्रक जारी करण्यात आले होते. कांद्यावर घातलेल्या निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. मात्र आता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी मागे घेतली आहे. त्यामुळे कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सप्टेंबर महिन्यात केंद्रसरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. तब्बल ३ महिन्यानंतर आता कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवल्याने कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कांद्याचे नुकसान झाल्याने कांद्याने शंभरी गाठली होती. मात्र नवीन पिक येऊ लागल्याने देशातील काही भागात कांद्याचे दर काही प्रमाणात कमी होऊ लागले आहेत.

- Advertisement -

सरकार पुढच्या महिन्यापासून कांद्याच्या निर्यातील घातलेले सगळे निकष दिढ महिन्यांसाठी मागे घेण्यात आले आहेत. यामुळे देशाअंतर्गत व्यवयास वाढून किरकोळ किंमतीही तपासता येणार आहेत. गेल्या महिन्यांपूर्वी सरकारने दक्षिणेकडील कांदा निर्यातील परवानगी दिली होती. महाराष्ट्रातील कांद्याला परवानगी न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. मात्र आता केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कांदा निर्यातीला दिलासा मिळाला आहे.


हेही वाचा – New Year Guidelines: नववर्षासाठी राज्यसरकारकडून गाईडलाईन्स जारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -