घरताज्या घडामोडीCovaxin Corona Vaccine Approved: सीरमनंतर भारतात बायोटेकला मंजुरी

Covaxin Corona Vaccine Approved: सीरमनंतर भारतात बायोटेकला मंजुरी

Subscribe

सीरम पाठोपाठ आता सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)च्या कोरोनावरील तज्ज्ञ समितीने भारत बायोटेकची देशी कोविड लस कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.

कोरोना साथीच्या विरोधातील लढ्यात देशाला आता दुसरं मोठं यश मिळालं आहे. सीरम पाठोपाठ आता सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)च्या कोरोनावरील तज्ज्ञ समितीने भारत बायोटेकची देशी कोविड लस कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता मिळाली असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. कोवॅक्सिन ही भारत बायोटेकद्वारा विकसित केलेली देशी लस आहे. अशा प्रकारे तज्ञ समितीने मंजूर केलेली ही दुसरी लस असून यापूर्वी, ऑक्सफोर्ड लसीला तज्ज्ञ समितीने हिरवा कंदिल दाखवला आहे.

- Advertisement -

देशातील सर्वच राज्यात आजपासून ड्राय रनला सुरुवात झाली आहे. एकीकडे ड्राय रनला सुरुवात झाली असून दुसरीकडे दुसऱ्या लसीलाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लवकरत लसी करणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

त्यासोबतच मुंबई महापालिकेनेही लसीकरणासाठी संपूर्ण तयारी केली आहे. मुंबईत केईएम, शीव, नायर, कूपर, वांद्रे भाभा रुग्णालय, व्ही. एन. देसाई, राजावाडी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात लसीकरणाची तयारी करण्यात आली आहे. या आठ केंद्रातून मुंबईकरांना लस टोचली जाणार आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -