घरमहाराष्ट्रस्वाईन फ्लूला न घाबरताल औषधोपचार करा - डॉ. दीपक सावंत

स्वाईन फ्लूला न घाबरताल औषधोपचार करा – डॉ. दीपक सावंत

Subscribe

राज्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी पुणे येथे बैठक घेतली. या बैठकीत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी नागरिकांनो स्वाईन फ्लूला न घाबरताल औषधोपचार करा असे आवाहन केले आहे.

पुणे शहरात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे २४ तासापेक्षा जास्त काळ राहिल्यास नागरिकांनी घाबरुन न जाता स्वाईन फ्लू प्रतिबंधक औषधोपचार सुरु करावेत. त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी खासगी रुग्णालयांचा या संदर्भात आठवड्यातून एकदा आढावा घ्यावा, असे निर्देश आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पुणे येथील बैठकीत दिले आहेत.

१ लाख २८ हजार व्यक्तींना स्वाईन फ्लूचे लसीकरण 

स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी मंगळवारी पुणे येथे भेट दिली. तसेच राज्यात जून अखेर पर्यंत एक लाख २८ हजार अतिजोखमीच्या व्यक्तींना स्वाईन फ्लूचे लसीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर साथीचे आजार संदर्भातील आढावा बैठक घेऊन त्यांनी स्वाईन फ्लू प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

- Advertisement -

पुणे आणि ग्रामीण भागात स्वाईन फ्लूच्या संख्येत वाढ

ऑगस्ट महिन्यात पुणे शहर आणि इतर ग्रामीण भागात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वातावरणातील बदल आणि पुर्वानुभव लक्षात घेता सर्वेक्षण, निदान, उपचार, आरोग्य शिक्षण, प्रशिक्षण आदी बाबींकडे लक्ष देण्याबाबतच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये स्वाईन फ्ल्यूसाठी लागणाऱ्या औषधांचा आढावा घेण्यात आला आहे. २०१८ साठी ट्रायव्हॅलेंट लस वापरणे हे योग्य असल्याचा निर्वाळा एन आय व्ही मधील तज्ज्ञांनी दिला आहे. तर ऑसेलटॅमिविर हे औषध उपलब्ध करावे असे आरोग्यमंत्र्यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाला सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -