घरताज्या घडामोडीकोरोनाचे नियम मोडणाऱ्या अरबाज, सोहेल खानच्या अडचणीत वाढ 

कोरोनाचे नियम मोडणाऱ्या अरबाज, सोहेल खानच्या अडचणीत वाढ 

Subscribe

कोरोनाबाबतचे नियम मोडल्याने तिघांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

युएईहून मुंबईमध्ये परतल्यावर अभिनेता अरबाज खान, सोहेल खान आणि सोहेल खानचा मुलगा निर्वाण खान यांनी कोरोनाच्या नियमांनुसार स्वतः क्वारंटाईन करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी थेट घरी पळ काढला होता. आता या तिघांनाही मुंबई महापालिका आणि पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना क्वारंटाईन केले आहे. परंतु, त्यांना भायखळा येथील जंबो कोविड सेंटरमध्ये की ताज लॅन्ड एन्ड हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे, हे स्पष्ट झालेले नाही. तसेच या तिघांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याबाबतची माहिती दिली.

बॉलिवूड अभिनेते अरबाज खान, सोहेल खान, तसेच सोहेलचा मुलगा निर्वाण खान हे तिघे २५ डिसेंबरला युएईहून मुंबई एअरपोर्टला दाखल झाले होते. कोरोना संदर्भातील नियमांनुसार, या तिघांनीही ७ दिवस संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये राहणे बंधनकारक होते. मात्र, तसे न करता या तिघांनीही थेट वांद्रे येथील त्यांचे घर गाठले. कोरोनाबाबतचे नियम मोडल्याने त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

- Advertisement -

अरबाज, सोहेल आणि निर्वाण यांनी स्वतःला संस्थात्मक क्वारंटाईन करणे अपेक्षित होते. परंतु, ते थेट घरी गेले. त्यांनी अनेक नागरिकांचे जीव धोक्यात आणल्याने मुंबई महापालिकेने खार पोलीस ठाण्यात या तिघांच्या विरोधात ‘साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ भारतीय दंड संहिता १८६०’ नुसार ‘एफआयआर’ दाखल केला आहे. ‘तिघांविरोधात पोलिसांनी आवश्यक कलमान्वये गुन्हा दाखल केला असून न्यायालयीन आदेशानुसार त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’ असे सुरेश काकाणी यांनी सांगितले. अरबाज, सोहेल आणि निर्वाण यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -