घरक्रीडाIND vs AUS : 'हा' खेळाडू केवळ भारताचे नाही, कसोटी क्रिकेटचे भविष्य!

IND vs AUS : ‘हा’ खेळाडू केवळ भारताचे नाही, कसोटी क्रिकेटचे भविष्य!

Subscribe

विरेंद्र सेहवाग आणि व्ही. व्ही. एस लक्ष्मण यांनीही या खेळाडूचे कौतुक केले.   

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या सुरु असलेल्या सिडनी कसोटीत भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाची पहिल्या दिवसअखेर २ बाद १६६ अशी धावसंख्या होती. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांनी झटपट विकेट गमावल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव ३३८ धावांवर आटोपला. याचे उत्तर देताना भारताची दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ९६ अशी धावसंख्या होती. भारताकडून युवा फलंदाज शुभमन गिलने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने १०१ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ५० धावांची खेळी केली. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील पहिले अर्धशतक ठरले. त्याच्या या खेळीने अनेक माजी क्रिकेटपटू प्रभावित झाले. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने त्याला कसोटी क्रिकेटचे भविष्य म्हणून संबोधले.

तसेच भारताचे माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आणि व्ही. व्ही. एस लक्ष्मण यांनीही गिलचे कौतुक केले. ‘शुभमन गिल उत्कृष्ट खेळाडू दिसत आहे. तो संयम राखून फलंदाजी करतो. त्याने बॅकफूटवरून मारलेले फटके मला आवडले,’ असे सेहवागने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले. तसेच लक्ष्मण म्हणाला, ‘गिल केवळ त्याचा दुसरा कसोटी सामना खेळत आहे. मात्र, त्याचा खेळपट्टीवरील वावर आणि त्याची फलंदाजी पाहून असे वाटते की तो बराच काळ क्रिकेट खेळत आहे. तो चांगला बचाव करतो, आक्रमक फटकेही मारतो आणि त्याच्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत त्याचे भविष्य उज्ज्वल आहे.’

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -