घरमहाराष्ट्रअंबरनाथमध्ये गोळीबार करत भरदिवसा ज्वेलर्सवर दरोडा

अंबरनाथमध्ये गोळीबार करत भरदिवसा ज्वेलर्सवर दरोडा

Subscribe

गोळीबार करत ३० तोळ्यांची लूट, तीन जण जखमी

अंबरनाथ सर्वोदय मार्केटमध्ये असलेल्या भवानी ज्वेलर्समध्ये भरदिवसा दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार दरोडेखोरांनी गोळीबार करून दरोडा टाकून पळ काढल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या गोळीबारात तीन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दरोड्यात २५ते ३० तोळे सोन्याचे दागिने लुटल्याची माहिती समोर येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दरोडेखोरांच्या शोधासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहे. बोईसर, मीरारोड, अंबरनाथ येथे एकापाठोपाठ एक असे तीन ज्वेलर्स दुकानांवर पडलेल्या दरोड्यामुळे ज्वेलर्स दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अंबरनाथ पश्चिम येथील सर्वोदय मार्केट या ठिकाणी भवानी ज्वेलर्स हे सोन्याच्या दागिन्यांचे दुकान आहे. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार शस्त्रधारी दरोडेखोरांनी दुकानात घुसून हवेत गोळीबार करत लूटमार सुरू केली. दुकानातील दागिने लुटून पळ काढत असताना दुकानातील कर्मचार्‍यांनी दरोडेखोर यांना विरोध करताच चौघांपैकी एकाने गोळीबार केला, तर एकाने दोघांवर चाकूने हल्ला करून मोटरसायकलवरून पळ काढला. या गोळीबारात एका कर्मचार्‍याला दोन गोळ्या लागल्या. इतर दोघे चाकू हल्ल्यात जखमी झाले आहेत. हा सर्व प्रकार भरबाजारात सुरू असताना एक ही जण दरोडेखोरांना घाबरून रोखण्यासाठी पुढे आला नाही.

- Advertisement -

या दरोड्याची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असून या घटनेप्रकरणी पळून गेलेल्या दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली. या घटनेत दुकानातील २५ ते ३०तोळे सोन्याचे दागिने लुटून पळ काढण्यात आला आहे. बोईसर, मीरारोड पाठोपाठ अंबरनाथ येथे ज्वेलर्स दुकानावर पडलेल्या दरोड्याच्या घटनेमुळे ज्वेलर्स मालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -