घरक्राइमकॉपीराईटचे उल्लंघनप्रकरणी महामूव्हीच्या CEO ला अटक

कॉपीराईटचे उल्लंघनप्रकरणी महामूव्हीच्या CEO ला अटक

Subscribe

प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांच्या प्रोडक्शनच्या चित्रपटाचे बेकायदेशीर प्रसारण करुन कॉपीराईट कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महामूव्हीच्या सीईओला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. संजय सुखदेव वर्मा असे या आरोपीचे नाव असून तो दिल्लीचा प्रितमपुराचा रहिवाशी आहे. यापूर्वी याच गुन्ह्यात मोहम्मद बिलाल मोहम्मद गफार शेख आणि धनश्याम सुरजबली गिरी या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. या दोघांनाही लोकल कोर्टाने जामिनावर सोडून दिले आहे.

या गुन्ह्यात स्वप्नाली साळुंखे, नारायण शर्मा, धनश्याम गिरी याचे काही सहकारी, झोया फिल्मचे मालक परवीन शेख, सोनम म्युझिक कंपनीचे मालक आणि इतर कर्मचारी, व्हीआयपी फिल्मचे मालक आणि इतर कर्मचारी, टेलिव्हिजन कन्झुमर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक, डी व्ही मीडिया इंटरटेंनमेंट अ‍ॅण्ड प्रायव्हेट लिमिटेड, दाखी मीडिया वर्क्सचे संचालक आणि इतरांना पहिले आरोपी दाखविण्यात आले आहे. लवकरच त्यांना अटक केली जाणार आहे. यातील तक्रारदार बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांचा मुलगा पुनित मेहरा यांनी जुहू पोलीस ठाण्यात एका लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती.

- Advertisement -

आपल्या कंपनीकडे चित्रपटांचे अधिकार आणि प्रसारण हक्क असताना त्याचे अनधिकृतपणे प्रसारण केले जात आहे, अशी तक्रार पुनित मेहरा केली होती. या तक्रारीनंतर संबंधितांविरुद्ध जुहू पोलिसांनी फसवणुकीसह कॉपी राईट अ‍ॅक्ट कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. हा तपास हाती येताच मोहम्मद बिलाल आणि धनश्याम गिरी या दोघांना पोलिसांनी अटक केली. मात्र, नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -