घरमुंबईबाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला राज-उद्धव एकत्र येणार

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला राज-उद्धव एकत्र येणार

Subscribe

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक दादर येथे उभारण्याचे काम जरी रखडले असले तरी त्यांचा आकर्षक पूर्णाकृती पुतळा रिगल सिनेमासमोरील श्यामाप्रसाद मुखर्जी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाजवळील जागेत बसविण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी रोजी जयंती असून यादिवशी या पुतळ्याचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, बाळासाहेबांचे पुतणे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याने दोघांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे १४ महिन्यांनी पुन्हा व्यासपीठावर एकत्र येणार असल्याने दोन्ही भावांमधील दुरावा दूर करण्यासाठी बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण निमित्त ठरो, अशी अपेक्षा शिवसैनिक आणि मनसैनिक व्यक्त करत आहेत.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक शिवाजी पार्क येथील जुन्या महापौर निवासस्थानी उभारण्याचे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वप्न आहे. मात्र, शिवसेना-भाजप युतीची सत्ता असतानाही ते स्मारक उभारण्यात शिवसेनेला काही अडचणी आल्या. दुसरीकडे बाळासाहेबांचा भव्य पुतळा मुंबईत दर्शनी भागात उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला. मात्र, त्यासाठी जागेचा शोध घेतल्यानंतर अखेर रिगल सिनेमा समोरील मोकळ्या जागेत बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याचे मुंबई महापालिकेकडून नक्की करण्यात आले असून, पुतळा प्रबोधन संस्थेने बनवला असून मुंबई पालिका त्याची देखभाल करणार आह

- Advertisement -

पुन्हा जागेची अडचण आली आणि मग जागा बदलण्यात आली. रिगल सिनेमा समोरीलच श्यामाप्रसाद मुखर्जी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाजवळील जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यावर शिक्कामोर्तब झाले. आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी रोजी जयंती असून यादिवशी या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय दिग्गज नेते कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यातील सर्वपक्षीय बडे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

२३ जानेवारीला अनावरण

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ ला निधन झाले. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ऑक्टोबर २०१५ ला गटनेत्यांच्या बैठकीत मांडला. त्याला तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंजुरी देऊन पालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला होता.

पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर हा प्रस्ताव महाराष्ट्र पुरातत्व कमिटीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. पुरातत्व कमिटीने पुतळा उभारण्यास मंजुरी दिली. मात्र मुंबई अर्बन आर्टस् कमिशन यांच्याकडून पुतळा बसवण्यासाठी होकार मिळाला नव्हता. तसेच पुतळा उभारताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने सदर प्रस्ताव राज्य सरकाराच्या गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. पुतळा उभारण्यासाठी सर्व परवानग्या मिळाल्या. त्यामुळे येत्या २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे.

कसा आहे बाळासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ९ फूट उंचीचा पुतळा अधिक २ फूट उंच हिरवळ (लँडस्केप) चबुतरा यांसह ११ फूट उंच उभारण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांचा पूर्णाकृती पुतळा बनवण्याचे काम शिल्पकार शशिकांत वडके यांनी जोगेश्वरी येथील मातोश्री क्रीडा संकुलानजीक आमदार रवींद्र वायकर यांच्या निगराणीखाली केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -