घरठाणेडोंबिवलीत मनसेला मोठं खिंडार; शेकडो मनसे कार्यकर्त्यांच्या हाती शिवबंधन

डोंबिवलीत मनसेला मोठं खिंडार; शेकडो मनसे कार्यकर्त्यांच्या हाती शिवबंधन

Subscribe

डोंबिवलीतील मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका तोंडावर आलेल्या असताना मनसे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठं खिंडार पडलं आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी केलेला हा पक्षप्रवेश वर्षानिवास्थानी केला असून शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी शिवबंधन हाती बांधले असल्याचे सांगितले जात आहे. कल्याणयेथील लोकसभेचे आमदार श्रीकांत शिंदे तसेच शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी मनसेचे कल्याण तालुक्यातील माजी अध्यक्ष अर्जुन पाटील, दीपक भोसले यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अर्जुन पाटील यांच्यासह डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम, विद्यार्थी सेना पदाधिकारी सागर जेधे यांनीही प्रवेश केला

जे शिवसेनेत आले आहेत त्यांचं सर्वांचं स्वागत. शिवसेनेची ताकद कल्याण डोंबिवलीत आहेच, ती आता अधिक वाढते आहे. महाराष्ट्रातही ही ताकद वाढत आहे. शिवसेनेच्या भगव्या खाली एकत्र येत आहेत. या सर्वांच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा ज्या काही असतील त्या पूर्ण करण्यासाठी वाव या सर्व तरूणांना दिला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेशाच्या वेळी म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली आहे. बजेट देशासाठी हवं, निवडणुकांसाठी नको, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली.

- Advertisement -

तसेच, आता तुम्हाला भेटायला आलो म्हणून बोलायचं म्हणून काहीही बोलणार नाही. मी थोडा अवधी घेऊन बोलेल. पण जे काही ऐकायला आलंय त्यावरून बजेट देशासाठी हवा, निवडणुकांसाठी नको, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. अर्थसंकल्पाची सर्व माहिती घेऊन त्याचा सारांश समजून घेऊन मी त्यावर भाष्य करेल, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -