घरदेश-विदेशFarmer protest: ट्रॅक्टर रॅलीनंतर पंजाबमधील १०० हून अधिक शेतकरी बेपत्ता

Farmer protest: ट्रॅक्टर रॅलीनंतर पंजाबमधील १०० हून अधिक शेतकरी बेपत्ता

Subscribe

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेले दोन महिने शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी निषेध करण्यासाठी ट्रॅक्टर रॅली काढली. मात्र, या रॅलीला हिंसक वळण लागलं. या रॅलीनंतर शेतकरी आंदलोक बेपत्ता असल्याचा बातम्या समोर येत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या रॅलीत भाग घेण्यासाठी दिल्ली येथे गेलेले पंजाब मधील १०० हून अधिक शेतकरी पंजाब मानवाधिकार संघटनेच्या म्हणण्यानुसार ‘बेपत्ता’ आहेत. खलरा मिशनच्या सहकार्याने, पीएचआरओने आज लाल किल्ल्यावरील हिंसाचारा प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या आंदोलकांना सोडवण्यासाठी कायदेशीर मदत देणार असल्याची घोषणा केली.

दिल्ली हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई करत अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. “पोलिसांनी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना लाल किल्ल्याकडे नेलं. तिथे निशान साहिब फडकावल्यावर एकच खळबळ उडाली होती. हा गुन्हा असू शकत नाही. तिरंग्याला स्पर्श झाला नाही. बहुतांश आंदोलकांना घटनास्थळी बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आलं आहे. तेव्हापासून त्यांचा ठावठिकाणा अद्याप कळू शकला नाही, असं कार्यकर्ते सरबजितसिंग वेरका म्हणाले.

- Advertisement -

पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाचे वकील हकाम सिंह म्हणाले की, पंजाबमधील किमान ८०-९० तरुण सिंघू आणि टिकरी येथे त्यांच्या आंदोलनस्थळी परत आले नाहीत. “वकीलांचा एक गट त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही पोलीस, फार्म युनियन आणि हॉस्पिटल यांच्या संपर्कात आहोत, असे ते म्हणाले. पंथीय ताल्मेल संघटनेच्या वतीने वकीलांनीही शेतऱ्यांना कायदेशीर मदत दिली. “आम्ही एफआयआरची छाननी करीत आहोत. बहुतेक शेतकर्‍यांवर डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी अ‍ॅक्ट, साथीचे रोग कायदा आणि प्राचीन स्मारके आणि पुरातत्व साइट व अवशेष कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला, ”असं एका वकिलाने सांगितलं. अखाल तख्तचे अध्यक्ष म्हणून काम करणारे नेते ग्यानी हरप्रीत सिंह म्हणाले, निशान साहिब हे शीख अस्मितेचे प्रतीक आहे. ध्वजारोहण हा गुन्हा नाही.

मोगा अहवालात म्हटलं आहे की, बेपत्ता झालेल्यांपैकी मोगा जिल्ह्यातील तातरी वाला गावातील १२ शेतकरी आहेत. अमृतपालसिंग, गुरप्रीतसिंग, दलजिंदरसिंग, जगदीपसिंग, जगदीशसिंग, नवदीपसिंग, बलवीरसिंग, भागसिंग, हरजिंदरसिंग, रणजितसिंग, रमनदीपसिंग व जसवंतसिंग अशी ग्रामपंचायतीने त्यांची ओळख पटविली. त्यांची मुक्तता करावी, असं आवाहन पंचायतीने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना केलं.

- Advertisement -

हेही वाचा – Farmer Protest: हिंसाचारानंतर चारशेहून अधिक शेतकरी बेपत्ता


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -