घरट्रेंडिंगइज्जत द्याल तर इज्जर मिळेल! अश्लील व्हिडिओ करणाऱ्यांच्या मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

इज्जत द्याल तर इज्जर मिळेल! अश्लील व्हिडिओ करणाऱ्यांच्या मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Subscribe

ऑन ड्यूटी २४ तास आपले कर्तव्य निभावणारे मुंबई नेहमीच त्यांच्या स्टाईलने गुन्हेगारांना शिक्षा देत असतात. मुंबई पोलीस जसे ऑन फिल्ड सेवेसाठी तत्पर असतात तितकेच ते ऑनलाईनही क्विक आणि फास्ट आहेत. याचा प्रत्येय आपल्याला वेळोवेळी येत असतो. कोणताही संदेश लोकांपर्यंत पोहचवायचा असेल तरीही तो हटके स्टाईलने पण लोकांनाच्या कायम डोक्यात राहिल असा सांगण्यात येतो. मुंबई पोलीस सोशल मीडियावर खूप जास्त सक्रिय असतात. सोशल मीडियावर मनमानी करुन महिलांविषयी अश्लील शब्द वापरणाऱ्या दोघांना मुंबई पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचा व्हायरल झालेला व्हिडिओही मुंबई पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. महिलांच्या सुरक्षिततेची काळजी मुंबई पोलीस नेहमीच घेताना दिसत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)


सोशल मीडियावर दोन मवाली मुलांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये दोन्ही मुले अश्लील भाषेत बोलताना दिसत आहेत. व्हिडिओमधून त्यांनी थेट बलात्कार करण्याची भाषा वापरली आहे. त्याची भाषा ऐकून कोणालाही राग आणि तिरस्कार वाटेल अशा भाषेत ते बोलत आहेत. या मुलांना चुनाभट्टी पोलिसांनी कुर्ला येथून ताब्यात घेतले आहे. त्यातील एक मुलगा फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ‘सोशल मीडियावर महिलांविरुद्ध अपमानास्पद संगीत व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल चुनाभट्टी पोलिसांनी कुर्ला पूर्व येथून एका आरोपीला अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. दोन्ही आरोपींवर आयपीसी आणि आयटी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला येईल, इज्जत द्याल तर इज्जत मिळेल!’, असे मुंबई पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांचे फोटोही मुंबई पोलिसांनी शेअर केले आहेत. #Womensefty असा हॅशटॅगही मुंबई पोलिसांनी वापरला आहे.

- Advertisement -

हा व्हिडिओ अपलोड करणाऱ्या त्या मुलांना इन्स्टाग्रामवर २१ हजार फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी हा व्हिडिओ बॅन करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर अनेक जणांनी हा व्हिडिओ रिपोर्ट देखिल केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरवर्तन, अश्लील मेसेजेस, व्हिडिओ शेअर करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

- Advertisement -

मुंबई पोलिसांच्या कामाचे सोशल मीडियावर सर्वच कौतुक करताना दिसत आहेत. ‘मुंबई पोलिसांशी पंगा घेऊ नका’, असे म्हणत लोक मुंबई पोलिसांचे कौतुक करत आहेत. ऑनलाईन फ्रॉड असो किंवा, मोबाईल चोरी, हॅकिंग असे अनेक प्रश्न मुंबई पोलीस सोडवत असतात. कोरोनाच्या काळातही जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांनी योग्य शक्कल लढवली होती. सायबर विश्वास होणारे गुन्हे त्यांची माहिती त्यापासून बचाव करण्यासाठीच्या सूचना वेळोवेळी मुंबई पोलीस देताना दिसतात.

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -