घरताज्या घडामोडीकोकणचा राजा सिद्धिविनायकाच्या चरणी

कोकणचा राजा सिद्धिविनायकाच्या चरणी

Subscribe

कोकणातील आंबे बाप्पा चरणी अर्पण करून यावर्षीपासून संपूर्ण कोकणचा आणि कोकणातील शेतकऱ्यांचा हापूस ब्रँड विकसित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

कोकणचा राजा म्हणजे हापूस. हंगामातील पहिला आंबा मुहूर्ताचा आंबा मानला जातो. माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकण भूमी प्रति्ष्ठानने मुंबईच्या सिद्धिविनायकाच्या चरणी हापूस आंब्याची पहिली पेटी अर्पण केली. सोमवार सिद्धिविनायक मंदिरात प्रतिष्ठानचे संस्थापक संजय यादवराव यांनी बाप्पाच्या चरणी ही पेटी नैवेद्य म्हणून अर्पण केली. आंब्याची विधीवत पूजा करून पूर्ण हंगाम चांगला जाऊंदे, शेतकरी आर्थिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ होउ दे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. कोकणातील आंबे बाप्पा चरणी अर्पण करून यावर्षीपासून संपूर्ण कोकणचा आणि कोकणातील शेतकऱ्यांचा हापूस ब्रँड विकसित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. मुहूर्ताचा आंबा बाजारात दाखल झाला असला तरी हापूसचा मुख्य आंबा बाजारात यायला थोडा वेळ असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

६ डझन आंब्यांच्या पहिल्या पेटीला १५००० रुपयांचा भाव मिळण्याची शक्यता संजय यादवराव यांनी वर्तवली आहे. एक डझन आंबा २५०० रुपयांना उपलब्ध होणार आहे. आंबा उत्पादनाला यावर्षी भरगोस यश मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. यंदाच्या मोसमास एक विशेष गोष्ट म्हणजे शेतकर्‍यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी कोकणातील ५०० शेतकरी एकत्र येऊन लवकरच आंब्यांचा विशेष ब्रँड बाजारात लाँच करणार आहेत. कोकणातील आंबा बागायतदारांना स्वतःची विक्री व्यवस्था उभी करुन जगभरात कोकणातील हापूस विकसित करण्याच्या दृष्टीने गेल्या अनेक वर्षांपासून ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’ कार्यरत आहे.

- Advertisement -

आंबा उत्पादक ते ग्राहक’ अशी थेट सेवा देणारा ‘आंबा महोत्सव’ प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आयोजित केला जातो. गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे हा महोत्सव आयोजित करता आला नाही. यंदा हा आंबा महोत्सव मुंबईत पार पडणार आहे. फलोद्यान, हापूस आंबा, सागरी संपत्ती, पर्यटन उद्योग, कृषी पर्यटन या सगळ्यांचे व्यवस्थित नियोजन केले तर देशातील सर्वांत प्रगत प्रदेश म्हणून कोकणची ओळख होईल याचसाठी कोकण भूमी प्रतिष्ठान काम करीत आहे.


हेही वाचा – Vasant Panchami 2021: पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाहसोहळा संपन्न

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -