घरमुंबईआली महागाई! रिक्षा, टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ

आली महागाई! रिक्षा, टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ

Subscribe

रिक्षा, टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ रिक्षाचे भाडे १८ वरून २१ रुपये, टॅक्सीचे भाडे २२ वरून २५ रुपये

मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. रिक्षाचे भाडे 18 रुपयांवरुन 21 रुपये तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये झाले आहे. मुंबई एमएमआर रिजनमध्ये ही भाडेवाढ लागू असेल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. 1 मार्चपासून ही भाडेवाढ लागू होईल तर 31 मेपर्यंत मीटर कॅलिबरेशन पूर्ण व्हायला पाहिजे, असेही अनिल परब यांनी यावेळी बोलताना सांगितले.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी रिक्षा आणि टॅक्सी यांच्या दरात झालेल्या वाढीसंदर्भात माहिती दिली. तसेच त्यावेळी बोलताना खटुआ समितीच्या शिफारशीनुसार, एमएमआर रिजनमधील रिक्षा टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे अनिल परब म्हणाले.

- Advertisement -

रिक्षाचे दरात तीन रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता रिक्षाच्या पहिल्या टप्प्याला 18 रुपयांऐवजी 21 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरला 14.20 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच टॅक्सीच्या दरात 22 रुपयांऐवजी 25 रुपये मोजावे लागणार आहेत. पहिल्या टप्प्यानंतर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरला 16 रुपये मोजावे लागणार आहेत. 1 मार्च 2021 पासून ही भाडेवाढ लागू होणार आहे. 1 मार्च ते 31 मेपर्यंत कार्डनुसार हे भाडे आकारता येणार आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

1 मार्च ते 31 मेपर्यंत कार्डनुसार भाडे आकारता येईल. त्यानंतर 1 जूनपासून मीटरमध्ये बदल झाला पाहिजे. गेल्या 6 वर्षांपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे भाडेवाढ करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -