घरमहाराष्ट्रनाशिकमहापालिका स्थायी समितीत १६ पैकी १४ नवे खेळाडू

महापालिका स्थायी समितीत १६ पैकी १४ नवे खेळाडू

Subscribe

भाजपची १ जागा घटली, शिवसेनेकडे ५, तर काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेला प्रत्येकी १ जागा

महापालिका स्थायी समितीवर वर्चस्व असलेल्या भाजपची एक जागा कमी होऊन शिवसेनेच्या पारड्यात एका जागेची वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपचे संख्याबळ ९ वरुन ८, तर शिवसेनेच्या सदस्यांची संख्या ४ वरुन ५ झाली आहे. नियमानुसार स्थायीवर आणखी एक जागा मिळावी, यासाठी शिवसेनेने न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाच्या निकालात उच्च न्यायालयाने निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी (दि.२४) महापालिका प्रशासनाने संपूर्ण १६ सदस्यांची फेरनिवड करत सावध पवित्रा घेतला.

स्थायीवरील सदस्य नियुक्तीसाठी विशेष ऑनलाईन महासभेचे आयोजन करण्यात आले होते. पालिकेतील भाजपची सदस्यसंख्या ६६ वरून ६४ झाल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थायी समितीवरील एक सदस्य कमी करून शिवसेनेचा एक सदस्य वाढवण्यात आला. नव्याने निवड झालेल्या सदस्यांमध्ये गणेश गिते, सुधाकर बडगुजर आणि सत्यभामा गाडेकर या तीन सदस्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली.

- Advertisement -

या सदस्यांना मिळाली संधी

भाजप – इंदुबाई नागरे, प्रतिभा पवार, गणेश गिते, माधुरी बोलकर, योगेश हिरे, हिमगौरी आडके, रंजना भानसी, मुकेश शहाणे

शिवसेना – सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर, रत्नमाला राणे, केशव पोरजे, ज्योती खोले

- Advertisement -

काँग्रेस – राहुल दिवे

राष्ट्रवादी काँग्रेस – समिना मेनन

मनसे – सलीम शेख

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -