घरताज्या घडामोडीपूजा चव्हाणचे संजय राठोडसोबतचे नवे फोटो व्हायरल

पूजा चव्हाणचे संजय राठोडसोबतचे नवे फोटो व्हायरल

Subscribe

पूजा चव्हाण हिने संजय राठोड यांच्यासोबत काढलेले नवीन सेल्फी फोटो व्हायरल झाले आहेत.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधकांकडून गेल्या आठवड्याभरापासून आरोप करण्यात येत आहेत. पूजाचा हत्यारा संजय राठोड असून त्याच्यावर अद्याप कारवाई का केली जात नाही?, असा एकच सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. त्यातच दररोज नवनवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी पूजा आणि संजय राठोड यांचे वाढदिवसाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा एका मराठी वृत्तवाहिनेने पूजा आणि संजयचे सेल्फी फोटो व्हायरल केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

काय आहे त्या फोटोंमध्ये

नुकत्याच व्हायरल झालेल्या फोटोमध्ये पूजा आणि संजय राठोड सेल्फी काढताना दिसत आहे. तसेच एक फोटो व्हायरल झाला असून त्या फोटोमध्ये सोन्याची अंगठी आणि चैन देखील दिसत आहे. तर काही साडीवरील फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आता या फोटोमुळे पुन्हा एकदा संजय राठोडवर बोट दाखवले जात आहे.

- Advertisement -

बंजारा समाजाच्या समर्थकांची तोबा गर्दी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वादात अडकलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड तब्बल १५ दिवसानंतर घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांनी पोहरादेवी मंदिरात हजेरी लावली होती. यावेळी बंजारा समाजाच्या समर्थकांनी तोबा गर्दी केली होती. या गर्दीप्रकरणी आता पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. ‘पोहरादेवी गर्दीप्रकरणी आपला माणूस असेल तरी कारवाई होणार’, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘जो चुकलाय त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत’, असे ते म्हणाले आहेत.


हेही वाचा – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: पुणे पोलीस रक्षक नाहीत तर भक्षक आहेत- चित्रा वाघ

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -