घरमुंबईदुसर्‍या दिवशी मुंबईत हजारपेक्षा जास्त रुग्ण

दुसर्‍या दिवशी मुंबईत हजारपेक्षा जास्त रुग्ण

Subscribe

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारचा अपवाद वगळता गुरुवारी सलग दुसर्‍या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत एक हजारच्या पुढे वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबईत गुरुवारी १,१४५ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. बुधवारी, २४ फेब्रुवारी रोजी ११६७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. विशेष म्हणजे आढळणार्‍या कोरोना रुग्णांपैकी ८० ते ८५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत, अशी माहिती महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.

मुंबईत सध्या कोरोनाचे ८,९९७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनामुळे मुंबईत आज पाच रुग्णांचा मृत्यू झाला. ४६३ रुग्ण कोरोनामधून बरे झाले. कोरोनामधून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के आहे. मुंबईत आतापर्यंत ३ लाखांहून जास्त रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. कोरोनामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी २७३ दिवस झाला आहे. १८ ते २४ फेब्रुवारी दरम्यान कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण ०.२५ टक्के आहे.

- Advertisement -

कोरोनाची लक्षणेच नाहीत.
मुंबईत दररोज सापडणार्‍या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी जवळजवळ ८० ते ८५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळलेली नाहीत, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे. बुधवारी मुंबईत ११०० पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले. मात्र, त्यापैकी ८३ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणेच आढळली नाहीत, असे चहल म्हणाले.

राज्यातील एकूण ७८ टक्के रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल आहेत. तर मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या ४९ टक्के इतकी आहे. मागील काही आठवड्यांची आकडेवारी तपासली असता त्यापैकी सुमारे ७८ ते ७२ टक्के रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसलेली नाहीत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे ज्या रुग्णांना कोणतीही लक्षणे आढळत नाहीत, अशांना दाखल करून घेऊ नका, असे निर्देश महापालिका आयुक्त चहल यांनी खासगी रुग्णालयांना दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -