घरमुंबईराम कदम यांचा दोन दिवसांनंतर माफीनामा, पण आता पुढे काय?

राम कदम यांचा दोन दिवसांनंतर माफीनामा, पण आता पुढे काय?

Subscribe

राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर टीकेचा धुरळा उडाल्यानंतर आता दोन दिवसांनी त्यांनी ट्विटरवर माफी मागितली आहे. मात्र असं करत असताना त्यांनी सगळा आळ विरोधकांवरच टाकला आहे. विरोधकांनी निर्माण केलेल्या वादामुळे माता-भगिनींच्या भावना दुखावल्या गेल्याचं राम कदम ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

भाजपचे घाटकोपरमधील आमदार राम कदम यांनी अखेर सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर महिलांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यावर माफी मागितली आहे. याआधी राम कदम यांच्याकडून राज्य महिला आयोग आणि प्रदेश भाजपने त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर खुलासा मागितला आहे. त्या पार्श्वभूमीवर राम कदम यांनी अखेर त्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. यासंदर्भातील ट्वीट त्यांनी केले आहे. त्यामुळे या वादावर आता पडदा पडण्याची अपेक्षा भाजपमधील अंतर्गत सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, राम कदम यांनी केलेल्या वक्तव्याचं गांभीर्य पाहाता, त्यांच्याकडून फक्त माफी घेऊन हे प्रकरण संपण्याइतकं लहान आहे का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आधी दिलगिरी, मग माफी, पुढे काय?

घाटकोपरमधील दहीहंडी उत्सवादरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली होती. ‘त्यांनी त्वरीत माफी मागावी’ या मागणीपासून ते थेट ‘त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी किंवा त्यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये’पर्यंत कारवाईची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, हे सर्व प्रकरण तापत असल्याचे पाहून राम कदम यांनी सोपा मार्ग स्वीकारत कोणत्याही सार्वजनिक व्यासपीठाचा वापर न करता सोशल मीडियाचा आधार घेऊन दिलगिरी व्यक्त केली. वारंवार मागणी करूनही त्यांच्याकडून माफी हा शब्द वापरला जात नव्हता.

- Advertisement -

काय म्हणाले राम कदम ट्विटमध्ये?

अखेर ५ सप्टेंबर रोजी रात्री म्हणजेच हा सगळा वाद सुरू झाल्यानंतर दोन दिवसांनी राम कदम यांनी माफीनामा जाहीर केला आहे. मात्र तोही फक्च ट्वीटरवर. शिवाय हा माफीनामा लिहिताना राम कदम यांनी कोणत्याही स्वरूपात स्वत:ची चूक मान्य केलेली नाही. फक्त विरोधकांनी केलेल्या विपर्यासाचा संदर्भ देत माफी मागितली आहे.

माझ्या’ वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला आहे, त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली गेली. झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुन:श्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे.

सगळा आळ विरोधकांवरच!

दरम्यान, राम कदम यांनी जरी ‘माफी’ हा शब्द ट्विटमध्ये वापरला असला, तरी असं करताना त्यांनी चूक मान्य मात्र केलेली नाही. यासंदर्भात त्यांनी सगळा आळ हा विरोधकांवरच टाकला आहे. माफी मागतानाही ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केलेला आहे, त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली गेली’, असं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांनी झाल्या प्रकाराचा सारा आळ विरोधकांवरच ढकलला असल्याचं दिसून येत आहे.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – राम कदम औटघटकेचे भाजप प्रवक्ते; लवकरच होणार उचलबांगडी


फक्त माफीवर भागणार का?

दरम्यान, राम कदम यांनी मागितलेल्या माफीनंतर हे सगळं प्रकरण थंडावण्याची शक्यता आहे. मात्र, असं असलं, तरी राम कदमांनी केलेल्या वक्तव्यावर फक्त माफीनामा पुरेसा आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

जो न्याय प्रशांत परिचारकांना, तोच न्याय राम कदमांनाही लागू व्हावा. फक्त माफीनं भागणार नाही, आमदारकीही रद्द व्हावी.
चित्रा वाघ, नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस

राम कदम यांनी ही माफी नाईलाजाने मागितली आहे. महिला आयोगाने चौकशी जाहीर केली आह, पण आपल्याला माहिती आहे की या चौकशीचं काय होणार आहे. दुसरीकडेअजित पवारांनी घाणेरडं विधान करूनही त्यांची आमदारकी कुणी रद्द केली नव्हती. पण असं सगळं असलं तरी सध्या भारतीय पक्षाला सगळ्यातून शिताफीने सुटू शकतो याचा गर्व झाला आहे. तो गेल्याशिवाय या माफीला अर्थ नाही.
नीलम गोऱ्हे, प्रवक्त्या, शिवसेना

राम कदम हा रावणासारखा वागत आहे. त्याने ट्विट काय केलं याच्याशी देणं घेणं नाही. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याला पोलिसांनी तत्काळ अटक करावी ही आमची मागणी आहे.

नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -