घरमनोरंजनकलम ३७७ रद्द - वाचा काय म्हणाले बॉलिवूड कलाकार!

कलम ३७७ रद्द – वाचा काय म्हणाले बॉलिवूड कलाकार!

Subscribe

आज सुप्रिम कोर्टाने समलैंगिकतेवर ऐतिहासिक निर्णय दिला. समलैंगिक संबंध कायद्याने गुन्हा नसल्याचं नमूद करून सुप्रीम कोर्टानं एलजीबीटीक्यू समाजातील व्यक्तींना आनंदाची बातमी दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयाचं बॉलिवूडमधून स्वागत केलं जात आहे.

परस्पर संमतीने ठेवलेल्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज (गुरूवारी) सुप्रिम कोर्टात ऐतिहासिक निर्णय दिला. आता समलैंगिकांनाही समान नागरिकत्वाचे अधिकार मिळणार आहेत. समलैंगिक संबंध कायद्याने गुन्हा ठरवलेले कलम ३७७मध्ये या निर्णयामुळे सुधारणा किंवा ते रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयाचे दिग्दर्शक करण जोहर आणि बॉलिवूडमधील इतर कलाकारांनी स्वागत केलं आहे.

करण जोहरने ट्वीटर आणि इन्स्टावर ‘फाईनली’ असा मेसेज लिहिलेली एक पोस्ट शेअर केली आहे. आणि ही पोस्ट शेअर करताना करणने कॅप्शन मध्ये लिहीलं आहे की, ‘हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. आज मला गर्व वाटतोय. समलैंगिकतेला गुन्ह्यातून मुक्त करणं, कलम ३७७ रद्द करणं हा मानवतेच्या समान हक्कांचा विजय झाला आहे. आता देशाला त्याचा ऑक्सिजन परत मिळाला आहे’.

- Advertisement -

करण जोहरबरोबर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. अभिनेत्री दिया मिर्झा, लेखक चेतन भगत, अभिनेत्री निम्रत कौर यांनी ट्वीटरवर या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -