घरमनोरंजनजॉन अब्राहमचं न्यूड फोटोशूट

जॉन अब्राहमचं न्यूड फोटोशूट

Subscribe

बॉलिवूडमधील अभिनेता जॉन अब्राहमचा 'एक विलन रिटर्नस्' हा चित्रपट येत आहे.

बॉलिवूडमधील अभिनेता जॉन अब्राहमचा ‘एक विलन रिटर्नस्’ हा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. जॉन अब्राहम सोशल मिडियावर सक्रिय असतो. त्याने सेटवरुन एक न्यूड फोटो शेअर केला आहे. त्याच्या या फोटोची जोरदार चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरु आहे. या फोटोमध्ये जॉन अब्राहम एक विलन रिटर्नस् या चित्रपटाच्या सेटवर असून, तो एका बेडवर बसला आहे आणि एका उशीच्या मदतीने न्यूड फोटोशूट केले आहे.आणि कॅमेरात बघत हसत आहे. त्याच्या या फोटोला २ तासात ४ लाख पेक्षा जास्त नेटकऱ्यांनी लाइक्स आणि शेअर केले आहे. काही लोकांनी त्याच्या फिटनेसबाबतही कमेंट केली आहे. अरे तुझे कपडे गेले कुठे,अशी कमेंटही एका युजरने केली आहे. अनेक चाहत्यांनी खूप वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. या फोटसह जॉन अब्राहमने “कपडे येण्याची प्रतीक्षा करताना…सेटवरील माझं जीवन.” असे कॅप्शनही दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

जॉन अब्राहमचा नुकतंच मुंबई सागा या चित्रपटाचे टीझर रीलीज झाले. बॉलिवूड अभिनेते जॉन अब्राहम आणि इमरान हाशमी हे दोघेही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘मुंबई सागा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केले आहे. हा चित्रपट १९ मार्च ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा ही ८० च्या दशकातील असून जॉन अब्राहम यात एक गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Assembly Budget Session 2021: मग कशाला हवाय शक्ती कायदा?, फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -