घररायगडजिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा

जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा

Subscribe

जिल्हा परिषदेमार्फत पाण्याच्या नमुन्यांची जैविक तपासणी

रायगड जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येत असून, दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे होणार्‍या साथ रोगाच्या प्रादुर्भावास आळा घालण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेमार्फत पाण्याच्या नमुन्यांची जैविक तपासणी करण्यात आली. यामधील ८९.६४ टक्के नमुने शुद्ध, तर १०.३६ टक्के नमुने दूषित पाणी पुरवठ्याचे आढळून आले. हे दूषित स्त्रोत शुद्ध करण्यात आले आहेत.

पाण्यामधील जीवजंतू, जिवाणू, परजीवी पेशी, कृमी यांच्या अस्तित्त्वामुळे होणारे पाण्याचे प्रदूषण तपासण्यासाठी पाणी स्त्रोतामधील पाण्याचे नमुने घेऊन त्यांची जैविक तपासणी करण्यात आली. पाण्याच्या जैविक तपासणीमुळे मानवी आरोग्यास अपाय करणार्‍या कॉलरा, विषमज्वर, अतिसार, कर्करोग, यकृत, आतडे आणि त्वचेच्या रोगांवर प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करणे सुलभ होते.

- Advertisement -

ग्रामपंचायतींमार्फत २ हजार ६०६ पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामधील २७० पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. जैविक तपासणीत दूषित आलेल्या पाणी स्त्रोत टीसीएल पावडरच्या सहाय्याने शुद्ध करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने दिली आहे. नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, विषय समित्यांचे सभापती, विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य लक्ष ठेऊन आहेत.

पाण्याच्या या नमुन्यांची केवळ जैविक तपासणी झाली करण्यात आली असून, या पुढील काळात रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये फ्लोराईड, क्लोराईड, नायट्रेट, मँगनिज, सल्फेट, कॅल्शियम, सेलेनियम, आर्सेनिक, शिसे, सायनाईड, जस्त, क्रोमियम, पॉलिन्युक्लियर, अ‍ॅरोमॅटिक, हायड्रोकार्बन या घातक रासायनिक घटकांची तपासणी करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -