घरताज्या घडामोडीवैदू जात पंचायतने तरूणाला टाकले जातीबाहेर

वैदू जात पंचायतने तरूणाला टाकले जातीबाहेर

Subscribe

तक्रार न करण्यासाठी कुटुंबियांवर दबाव

राज्य सरकारने जात पंचायतींच्या मनमानी विरोधात सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा बनविला परंतु जात पंचायतींच्या तक्रारी मात्र कमी होत नाही. जातीतुन बहिष्कृत करण्याचे प्रकार वाढत चालले आहे. नाशिकला वैदू समाजाची जात पंचायत पोलीसांनी उधळून लावण्याचे प्रकरण ताजे असतांना वैदू समाजातील सिन्नर येथील कृष्णा शिंदे या तरुणास जाती बाहेर काढले गेले आहे. एवढेच नाही तर त्याला त्या समाजातील वाडीतून हाकलून लावले आहे.

सिन्नर येथील वैदुवाडी येथील तरूण कृष्णा शिंदे याचे अन्य जातीच्या मुलीशी प्रेम झाले. त्याला तिच्यासोबत होणारा आंतरजातीय विवाह वैदू जात पंचायतीस मान्य नव्हता.त्यांनी विवाहास फक्त विरोधच केला नाही तर मारहाणही केली. अमानुषपणे त्याला वाडीबाहेर काढले. तो सदर मुलीसोबत दुसर्‍या ठिकाणी राहु लागला.नाशिकला झालेल्या वैदू जात पंचायतच्या प्रकरणानंतर पिडीतास तक्रार करण्यासाठी हिंमत आली.मात्र जात पंचायतने त्याच्यावर तक्रार न करण्याचा दबाव आणला व दमदाटीही केली. परीवारानेही जात पंचायतला घाबरून तक्रार करू नको अशी भुमिका घेतली. त्याला डांबून ठेवण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला याची माहिती मिळताच सिन्नर पोलीसांशी संपर्क करण्यात आला मग त्याची सुटका झाली. अशा परिस्थितीत एका बाजुने जात पंचायतचा त्याचार व दुसर्‍या बाजुने कुटुंबाचा दबाव अशा कात्रीत तो सापडला आहे.

- Advertisement -

“अशा घटना पुरोगामी महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे. सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा होऊनही अशा घटना थांबत नाही. त्यामुळे अशा जात पंचावर गुन्हे दाखल होऊन पिडीत तरुणास सन्मानाचे आयुष्य बहाल झाले पाहिजे. “

– कृष्णा चांदगुडे,राज्य कार्यवाह, अंनिसचे जात पंचायत मूठमाती अभियान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -