घरCORONA UPDATEMaharashtra corona Update: राज्यात बुधवारी १३ हजार ६५९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Maharashtra corona Update: राज्यात बुधवारी १३ हजार ६५९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Subscribe

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात ३१ मार्च पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. राज्यात आज १३ हजार ६५९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज राज्यात ५४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी राज्यात आज ९ हजार ९१३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. आतापर्यंत राज्यात २० लाख ९९ हजार २०७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट हा ९३.२१ टक्के इतका आहे. राज्याचा मृत्यूदर २.३४ टक्के इतका आहे. राज्यात आता ४ लाख ७१ हजार १८७ लोक होम क्वारंटाईन आहेत. तर ४ हजार २४४ लोक हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

- Advertisement -

राज्यात सध्या ९९ हजार ८ कोरोना अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तर मुंबईचा विचार केला असता मुंबईत आतापर्यंत ३ लाख ३७ हजार १३४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत सध्या ९ हजार ९७३ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तर ठाण्यातही कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आकडा पाहता ठाण्यातही कंटेन्टमेंट झोनमध्ये लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. ठाण्यात सध्या १० हजार ४६० अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. रायगडमध्ये सध्या १ हजार २९९ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

कोकणाचा विचार केला असता सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या २०१ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. रत्नागिरीमध्ये १५६ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. पुण्यात सध्या १८ हजार ४७४ तर कोल्हापूरमध्ये २९० अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिवस आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत १ लाख ६४ हजार ६९८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सध्या नागपूरमध्ये १२ हजार ७२४ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.


हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत बुधवारी १ हजार ५३९ नव्या रुग्णांची नोंद
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -