घरमुंबईIND Vs ENG सामने पाहण्यासाठी मुंबईतून गेलेल्या प्रेक्षकांना क्वारंटाईन करा, आमदाराचे CM...

IND Vs ENG सामने पाहण्यासाठी मुंबईतून गेलेल्या प्रेक्षकांना क्वारंटाईन करा, आमदाराचे CM ला पत्र

Subscribe

प्रेक्षक स्टेडियममध्ये नियमांचे पालन करत नाहीत

भारत व इग्लंड क्रिकेट सामन्यांना सुरुवात झाली आहे. कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करुन हे सामने खेळवण्यात येत आहेत. भारत व इग्लंड सामने पाहण्यासाठी महाराष्ट्र आणि परदेशातून अनेक चाहते गेले आहेत. महारष्ट्रातून गेलेले क्रिकेटचे चाहते परतल्यावर त्यांची कोरोना चाचणी करुन क्वारंटाईन करण्याची मागणी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र राज्यात मोठयाप्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशाच्या इतर राज्यात देखील कोरोनाचा धोका वाढत आहे. महाराष्ट्र हे अंतरराष्टीय राज्य असून मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. येथे मोठयाप्रमाणात इतर राज्यातून लोक येत असतात. भारत व इंग्लड क्रिकेटचे सामने चालू असून मुंबईतून अनेक लोक ते सामने पाहण्यासाठी गेलेले आहेत. भारत व इंग्लंड क्रिकेट सामने पाहण्यासाठी स्टेडियम मध्ये प्रेक्षकांची संख्या कमी केली असली तरी प्रेक्षक त्या ठिकाणी कोरोना सबंधी घालण्यात आलेल्या नियमांचे पालन करित नसल्याचे दुरचित्रवहिनी मधून दिसून येते. आज महाराष्ट्र व मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.

करोनाचा वाढता धोका लक्षात घेता भारत व इंग्लड क्रिकेटचे सामने पाहून महाराष्ट्र व मुंबईत रेल्वे मार्गे, हवाई मार्गे व रोड मार्गे प्रवास करणाऱ्या नागरिकांना RTPCR Test (कोवीड टेस्ट) तसेच त्यांना जवळच काहि दिवसांसाठी क्वारंटाईन किंवा होम क्वारंटाईन करण्याची सक्‍ती करण्यात यावी. जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव थोडया प्रमाणात रोखता येईल तरी कृपया याबाबत आपण तातडीने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती. असे पत्र शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -