घरमनोरंजनअक्षय कुमारने दिले चाहत्यांना रिटर्न गिफ्ट

अक्षय कुमारने दिले चाहत्यांना रिटर्न गिफ्ट

Subscribe

अभिनेता अक्षय कुमार याने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार यांचा ५१ वा वाढदिवस असून या खास दिवसाचे निमित्त साधून त्याने आपल्या चाहत्यांनाच स्पेशल गिफ्ट दिले आहे. अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी चित्रपट ‘२.०’ मधील स्वतः लुक त्याने आपल्या फेसबुक पेज आणि ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.  ‘२.०’ या चित्रपटाचे टिझर येण्यासाठी केवळ ४ दिवसांचा अवकाश असल्याचे त्याने या पोस्टरसोबत नमूद केले आहे. सायन्स फिक्सनवर आधारीत या चित्रपटा साऊथचे सुपरस्टार रजनीकांत प्रमुख भूमिका साकारणार असून अक्षय कुमार यामध्ये व्हिलनच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. येत्या दिवाळीत हा बिग बजेट सिनेमा प्रदर्शीत होणार आहे.

- Advertisement -

खास बर्थडे सेलिब्रेशन

 

View this post on Instagram

 

Sometimes when you don’t plan things – it all falls in place – Happy Birthday to my lovely Mr K ! #birthdaybumps

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna) on

 ९ सप्टेंबर १९६७ साली अमृतसर येथे अक्षय कुमार याचा जन्म झाला होता. राजीव भाटिया हा बॉलीवूडमध्ये अक्षय कुमार या नावाने ओळखू लागला. आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकेने त्याने आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण केला. त्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन आधीच सुरू झाले असल्याचे फोटो त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. अभिनेता बॉबी देओलसह त्याची पत्नी तान्या, सनी दीवान आणि अनु दिवान हे अक्षय आणि ट्विंकलचे मित्रमंडळीही या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. ही पार्टी शनिवारी रात्री करण्यात आली.

- Advertisement -

दोन दिग्गज कलाकार एकत्र

‘२.०’ या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि रजनीकांत हे दोन दिग्गज कलाकार पहिल्यांदा एकत्र आले आहेत. रजनीकांत यांच्या २०१० साली आलेल्या ‘रोबो’ या चित्रपटाचा ‘२.०’ हा रिमेक असल्याचे सांगितले जाते. चित्रपटात अभिनेत्री एमी जॅक्सनदेखील भूमिका साकारत आहे. हा चित्रपट २९ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून अवघ्या काही दिवसात त्याचे टिझर लाँच करण्यात येणार असल्याने चाहत्यांना त्याची उत्सुकता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -