घरदेश-विदेशHDFC चे सिध्दार्थ संघवी, यांच्या खुनाचे गुढ वाढले!

HDFC चे सिध्दार्थ संघवी, यांच्या खुनाचे गुढ वाढले!

Subscribe

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष ३९ वर्षीय सिध्दार्थ संघवी ५ सप्टेंबरला मुंबईच्या कमला मिल कंपाऊडमधल्या एचडीएफसी बँकेच्या ऑफिसमधून बेपत्ता झाले होते. त्याचठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली होती.

पाच सप्टेंबरपासून बेपत्ता असलेल्या एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ संघवी यांचा मृतदेह सोमवारी (आज) सकाळी कल्याणमधल्या मलंगगड रोडवरील हाजी  मलंग या ठिकाणी सापडला. ५ सप्टेंबरलाच त्यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह काकड गावाजवळ टाकण्यात आला होता. सडलेल्या अवस्थेत सिध्दार्थ यांचा मृतेह सापडला. सिध्दार्थ यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.  या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी सरफराज शेख याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी (आज) त्याला भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आले पण कोर्टात हजर केल्यानंतर त्याने दिलेल्या जबाबानंतर या  हत्येचे गुढ आणखीणच वाढले आहे. आतापर्यंत या प्रकरणात दोनपेक्षा  अधिक व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र, शेख याच्या कबुलीनुसार त्याने एकट्यानेच पैशांसाठी हा खुन केला आहे. ‘मला ईएमआय भरायचा होता शिवाय माझ्यावर कर्ज देखील होते. तीन वर्षे मी कमला मिलमध्ये फॅब्रिकेशनचे काम केले आहे. मी त्यांच्याकडे पैशांची मागणी करत असताना माझ्या हातुन त्यांचा खुन झाला”, अशी कबुली शेख याने दिली आहे.

कमला मिलच्या पार्कींगमध्येच  हत्या

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष ३९ वर्षीय सिध्दार्थ संघवी ५ सप्टेंबरला मुंबईच्या कमला मिल कंपाऊडमधल्या एचडीएफसी बँकेच्या ऑफिसमधून बेपत्ता झाले होते. ऑफीसमधून बाहेर पडताच ते आपल्या कारकडे गेले मात्र, तेथे दबा धरुन बसलेल्या शेखने त्यांच्या गळ्यावर धारदार चाकुने वार केला आणि त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये डांबून कल्याणच्या हाजी मलंग भागात फेकला आणि नंतर ती कार नवी मुंबईच्या कोपरखैरणे भागात सोडुन दिली. या सगळ्या गुन्ह्याची आरोपीने कबुली दिली असली तरी हा खुन करणे एकट्याने शक्य नाही  असा अंदाज पोलिसांचा आहे.

- Advertisement -

८ तारखेला वडीलांचा, सिद्धार्थ सुखरुप असल्याचा फोन

दरम्यान, ५ तारखेला सिद्धार्थ संघवी घरी न परतल्यानंतर त्यांच्या वडीलांनी ना.म.जोशी  मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, पण ८ तारखेला एका नंबरवरुन संघवींच्या वडीलांना एक कॉल आला ज्यामध्ये सिद्धार्थ  एकदम सुखरुप आहे. तो लवकरच घरी परतेल असे सांगण्यात आले होते अशी  माहीती पोलिसांनी दिली. आरोपी शेख याने पैशांसाठी ही हत्या केल्याची कबुली दिली असली तरी पोलीस सर्व बाजुने तपास करत आहेत. या हत्येत दुसर्‍या कोणाचा सहभाग आहे का?  हे तपासण्यासाठी आरोपीला १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अन्य आरोपींच्या सहभागाची शक्यता

सिद्धार्थ संघवी यांची  गळा चिरुन  हत्या करण्यात आली असल्याने आरोपी त्यांना संपवायच्याच ईराद्याने आला होता. ज्या पद्धतीने त्यांचा खुन करुन पहील्यादा त्यांचा मृतदेह कल्याणमध्ये फेकण्यात आला आमि नंतर गाडी कोपरखैरणे इथे सोडण्यात आली यामुळे या हत्येचे प्लॅनिंग आधीपासुनच ठरले होेते आणी यामध्ये आणखी आरोपींचा सहभाग असलयाचा संशय पोलिसांना आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -