घरमनोरंजनअक्षय कुमार रुग्णालयात, झाली आहे कोरोनाची लागण

अक्षय कुमार रुग्णालयात, झाली आहे कोरोनाची लागण

Subscribe

याबाबतची माहिती अक्षयने नुकतीच आपल्या चाहत्यांनी दिली.

कोरोनाने विळख्यात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारही अडकला आहे. आज त्याला कोरोना उपचारांसाठी रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. याबाबतची माहिती अक्षयने नुकतीच आपल्या चाहत्यांनी दिली. याबाबत अक्षयने ट्विटरवर पोस्ट करत लिहिले की, आपण केलेल्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. तुम्ही केलेली प्रार्थना फळाला येत आहे. मी आता ठीक आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अधिक काळजी घेण्यासाठी मी हॉस्पीटलमध्ये भर्ती झालो आहे. आशा करतो लवकरचं घरी परतेन. तुमची काळजी घ्या. त्यांने स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती चाहत्यांना दिली आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय नेते आणि सेलिब्रिटींना कोरोनाने विळखा घातला आहे. आता यामध्ये पुन्हा अनेक सेलिब्रिटीची भर पडत आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पाठोपाठ अभिनेता गोविंदा, आदित्य नारायण, एजाज खान, तसचे अक्षय कुमारच्या ‘राम सेतु’ सिनेमातील तब्बल ४५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

दरम्यान रविवारी अक्षय कुमारने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. त्यांने स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे. ”माझा आज सकाळी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केले आहे. मी सध्या घरातच क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेले सर्व उपचार घेत आहे. मात्र, माझ्या संपर्कात येणाऱ्यांनी स्वत:ची काळजी घ्या. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी देखील कोरोनाची चाचणी करुन घ्यावी,” असे ट्विट अक्षयने केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

- Advertisement -

या पाठोपाठ अक्षय कुमारसह राम सेतु सिनेमाच्या सेटवरील ४५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. मालाडमधील मढ आयलॅंड येथे ५ एप्रिलला ‘राम सेतु’च्या सेटवर १०० जणांची टीम चित्रपटावर काम करत होती. यावेळी सेटवरील ज्युनिअर आर्टिस्ट सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. मात्र सेटवर येणाऱ्या प्रत्येकाला कोरोना चाचणी करणे बंधनकारक होते. चाचणीनंतर या चित्रपटाचा भाग असलेला अभिनेता अक्षय कुमारची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. दरम्यान अक्षय कुमारनंतर आत सेटवरील 100 जणांपैकी 45 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. यामुळे 5 एप्रिलपासून मुंबईत सुरु होणारे ‘राम सेतु’ चित्रपटाचे शूटिंग बंद ठेवण्यात आले आहे. तसेच पुढील जवळपास १५ दिवस शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)


हेही वाचा- happy birthday Rashmika: नॅशनल क्रश रश्मिका झाली २५ वर्षांची


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -