घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या हाती राज्य आलंय की, उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय, राज ठाकरेंचा...

उद्धव ठाकरेंच्या हाती राज्य आलंय की, उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय, राज ठाकरेंचा टोला

Subscribe

परप्रांतीय परत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती - राज ठाकरे

महाविकास आघाडीमधये दोन महिन्यांत दुसऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला आहे. राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. मागील सव्वा वर्षांपासून सरकार अनेक प्रकरण आणि कामापेक्षा बदनामी मध्ये सरकार गुंतले आहे यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक विनोद आला होता त्या विनोदात उद्धव ठाकरेंच्या हाती राज्य आलंय की, उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय असे सांगत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर व्हीसीद्वार संवाद साधला या संवादात मुख्यमंत्र्यांना काय सूचना दिल्या याबाबत सांगितले आहे. तसेच राज्य सरकारने परराज्यातून परतलेल्या नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या असत्या तर राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला नसता महाराष्ट्रातील जनतेला घरात बसून राहावे लागले नसते असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. लॉकडाऊन संदर्भात भेटीची विनंती केली होती परंतु त्यांचा फोन आला होता त्यांच्या सहकार्यांना कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे ते क्वारंटाईन आहे. त्यांची भेट झाली असतील तर तेव्हाच माध्यमांशी संवाद साधून भेटीमध्ये काय सूचना केल्या ते सांगितले असते असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला कारण आधी जो कोरोना विषाणू आला त्यापेक्षी मोठी लाट आली आहे. सर्वाधिक रुग्ण या लाटेमुळे सापडले आहेत. यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली की हे सर्वाधिक महाराष्ट्रात का दिसत आहे. याची दोन कारण आहेत. यातील पहिले कारण महाराष्ट्र हे औद्योजिक राज्य आहे त्यामुळे परराज्यातील लोकं महाराष्ट्रात येण्याचे प्रमाण अधिक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद होत नाही आहे त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा जास्त दिसत आहे.

- Advertisement -

परंतु देशात पाच राज्यात निवडणूक सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा वगेसरे सुरु आहेत. मात्र तेथे कोरोना नाही. सुरुवातील सरकारला सांगितले होते की, लॉकडाऊन काळात परतलेल्या परराज्यातील नगारिकांची पुन्हा येताना नोंद करावी त्यांची कोरोना चाचणी करावी त्यांना कोरोना आहे का नाही असे तपासून पाहावे परंतु राज्य सरकारने कोणतीही पाऊले उचलली नाही यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना घरात बसावे लागले आहे.

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना कोणत्या सूचना केल्या

छोट्या उद्योग समूहांना उत्पादन करण्यास सांगितले आहे परंतु त्यांना विकण्यास सांगितले नाही आहे. मग त्यांनी उत्पादन कुठे ठेवायचे त्यामुळे आठवड्यातून ३ दिवस त्यांना दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी दिली पाहिजे जेणेकरुन त्यांचे उत्पादन विकले जाईल.

- Advertisement -

बँकांची जबरदस्ती – गेल्या अनेक दिवसांपासून सगळे बंद आहेत अनेक लोकांनी काही गोष्टी घेतल्या आहेत. परंतु आपण समजू शकतो की बँकांकडे पैसे गेले पाहिजेत लोकांकडे पैसे असतील तर ते बँकांना देतील त्यामुळे राज्य सरकारने बँकांशी बोलले पाहिजेत. अनेक ठिकाणी बँक सक्तीने पैसे वसूल करत असल्याचे दिसत आहे. लॉकडाऊन असताना लोक बँकांना पैसे कसे देणार आहेत. राज्य सरकारने बँकांशी बोलून यावर मार्ग काढावा.

वीज बिल – सरसकट लॉकडाऊन काळात वीज बिल माफ करणे, जे व्यावसायिक आहेत त्यांना सवलत मिळावी. लोकांना दिलासा देणे गरजेचे आहे. वारंवार रुग्णांची आकडे वाढणे आणि लॉकडाऊन लावणे हे योग्य होणार नाही.

कंत्राटी कामगार- गेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक कंत्राटी कामगारांना राज्य सरकारने घेतले होते त्यानंतर कोरोना परिस्थिती कमी झाल्यावर त्यांना काढून टाकण्यात आले. त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या. या कंत्राटी कामगारांवर लक्ष द्यावे अशी सुचना मुख्यमंत्र्यांना दिले.

मनोरंजन क्षेत्र आणि जीम,सलून यांना आठवड्यातून २ दिवस सुरु ठेवण्याची परवानगी दयावी. क्रिडा क्षेत्रात सर्व बंद आहे. परंतु सराव करणाऱ्या खेळाडूंना सवलत देणे आवश्यक आहे. गर्दी होणार नाही परंतु त्यांना सराव करता येईल असे बघितले पाहिजे.

शेतकऱ्यांना या संपूर्ण काळामध्ये हमीभाव द्यावा कारण पुन्हा शेतकरी कोसळला तर पुन्हा मोठे संकट आपल्यावर येईल.

शाळांच्या संदर्भात सूचना केली होती की, शाळा बंद आहेत. परंतु शाळा ज्या फी आकारत आहेत त्या तशाच आहेत. शाळांच्या फी आर्ध्या घ्या कारण मुलांचे दीड वर्ष फुकट गेले आहेत. आता १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करायला हवे अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सूचना दिल्या आहेत. यावर राज्य सरकार तात्काळ कारवाई करतील सर्व सूचनांवर काहीतरी निर्णय घेतील असेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -