घरनवी मुंबईवाशीतील रिअल टेकपार्क इमारतीत भीषण अग्नितांडव

वाशीतील रिअल टेकपार्क इमारतीत भीषण अग्नितांडव

Subscribe

गेल्या चार दिवसांपूर्वीच मुंबईतील कुर्ला सीएसटी रोडवर मोटर पार्ट्सच्या दुकानाला भीषण आग लागली होती. कुर्ला पश्चिमेकडे कपाडियानगरजवळ मोटार स्पेअर्स पार्ट्सच्या दुकानानंतर आता वाशीतील रिअल टेकपार्क इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती मिळतेय. नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानक जवळ, सेक्टर ३० A याठिकाणी रिअल टेकपार्क या कंपनीच्या १४ व्या मजल्यावर साधारण दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास ही भीषण आग लागली आहे.

ही आग भीषण स्वरूपाची असल्याने घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या. नवी मुंबई अग्निशमन दलाच्या २ गाड्या आणि ५ टँकर, १ ब्रँटो तसेच तळोजा अग्निशमन दलाच्या वाहनाच्या सहाय्याने विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

नवी मुंबई अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगीमुळे धुराचे मोठ्या प्रमाणात लोट आजूबाजूच्या परिसरात पसरू लागले होते. या धुरामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं अवघड झाल्याने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तर शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात येत आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -