घरताज्या घडामोडीमोठी बातमी: सचिन वाझे प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे एनआयए प्रमुख अनिल शुक्लांची...

मोठी बातमी: सचिन वाझे प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे एनआयए प्रमुख अनिल शुक्लांची बदली

Subscribe

अनिल शुक्ला यांच्या अचानक बदलीमुळे चर्चेला उधाण

मुंबई एनआयएचे प्रमुख अनिल शुक्ला यांची मिझोरमला बदली करण्यात आली आहे. अनिल शुक्ला यांनी अंबानी स्फोटक प्रकरणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली अंबानी स्फोटक प्रकरणाची चौकशी सुरु आहे. यामध्ये आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. सचिन वाझे, विनायक शिंदे आणि रियाझुद्दीन काझी यांनाही अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत अनिल शुक्ला यांना अंबानी स्फोटक प्रकरणाच्या तपासात चांगले यश आले आहे. परंतु मुंबई एनआयए प्रमुख अनिल शुक्ला यांची मिझोरमला बदली करण्यात आली आहे.

एनआयएचे पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी ज्ञानेंद्र वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल शुक्ला हे महाराष्ट्र्र प्रतिनियुक्तीवर होते, त्यांना सहा वर्षे पूर्ण झाली होती. मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणापूर्वीच शुक्ला यांची बदली झाली होती, मात्र अंबानी प्रकरणात त्यांना मुदत वाढ देण्यात आली होती

- Advertisement -

मुकेश अंबानी स्फोटके प्रकरण तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरनाचा तपास त्याच्या मार्गदर्शनावावरून सुरू असताना त्यांच्या अचानक बदलीमुळे चर्चेला उधाण आले आहे. अनिल शुक्ला हे राज्यात प्रतिनियुक्तीवर आले होते व त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे नियमानुसार त्याची बदली करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. अनिल शुक्ला यांची त्यांच्या मायदेशी म्हणजेच मिझोरमला बदली करण्यात आली असून ते मिझोरम कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -