IPL 2021 : दीपक हुडाने केली राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई; केले यंदाचे सर्वात जलद अर्धशतक

हुडाने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक केले.

deepak hooda
दीपक हुडा

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मात्र, कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजांना योग्य ठरवण्यात अपयश आले आहे. पंजाब किंग्सच्या फलंदाजांना अप्रतिम कामगिरी केली. खासकरून दीपक हुडाने राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने अवघ्या २० चेंडूतच आपले अर्धशतक पूर्ण केले. हे यंदाच्या मोसमातील सर्वात जलद अर्धशतक ठरले. हुडाने डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक शैलीत फलंदाजी केली. त्याने शिवम दुबेच्या एका षटकात दोन, तर श्रेयस गोपाळच्या पुढील षटकात त्याने तीन षटकार मारले. त्यानंतर त्याने क्रिस मॉरिसच्याही षटकात एक षटकार मारला. त्यामुळे त्याने अवघ्या २० चेंडूत आपले अर्धशतक झळकावले.

पृथ्वीला टाकले मागे

त्याआधी यंदाच्या मोसमातील सर्वात जलद अर्धशतक दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉने केले होते. पृथ्वीने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध २७ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले होते. त्याने या सामन्यात ३८ चेंडूत ७२ धावांची खेळी केली होती. आज होत असलेल्या सामन्यात हुडाने २० चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. अखेर तो ६४ धावांवर बाद झाला. त्याने या धावा २८ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने केल्या.