घरमनोरंजनअर्जून कपूरच्या कार कलेक्शनमध्ये १ कोटीची लँड रोवर दाखल

अर्जून कपूरच्या कार कलेक्शनमध्ये १ कोटीची लँड रोवर दाखल

Subscribe

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरच्या कार कलेक्शनमध्ये एका नव्या लॅविश कारची भर पडली आहे. अर्जून कपूरने नुकतेच एक ‘लँड रोवर डिफेंडर’ कार खरेदी केली आहे. या कारची किंमत तब्बल १ कोटी रुपये इतकी आहे. दरम्यान याच महिन्यात अभिनेता कार्तिक आर्यनने देखील नवी कार खरेदी केली आहे. कार्तिकने ‘लम्बोर्गिनी उरुस’ कार खरेदी केली असून तिची किंमत तब्बल ३ कोटी इतकी आहे. याआधी अर्जून कपूरने ३२ व्या वाढदिवसानिमित्त स्वत:साठी निळ्या रंगाची ‘Maserati Levante’ कार खरेदी केली होती. त्यामुळे अर्जूनचे गाड्यांवरील प्रेम वेळोवेळी दिसुन येते.

अर्जून कपूर ‘लँड रोवर डिफेंडर’ या नव्या कारसह मुंबईत स्पॉट झाला. मुंबईच्या रस्त्यावर अर्जून या नव्या कारमधून फिरताना दिसला. तसेच कारसोबत त्याने फोटोसेशनही केले. यावेळी अर्जून कपूरने व्हाईट शर्ट आणि जीन्स परिधान केली होती.दरम्यान अभिनेत्री करिना कपूर, सैफ अली खान, शाहिद कपूर आणि दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना, शिल्पा शेट्टी, सारा अली खान, प्रभास आणि अनिल कपूरने यावर्षी नव्या महागड्या कार खरेदी केल्या आहेत.

- Advertisement -

अर्जून कपूर या नव्या कारसह नव्या प्रोजेक्टला घेऊनही चर्चेत आला आहे. कारण अर्जूनने आपल्या सोशल मीडियावर चाहत्यांना देत सांगितले की, ‘गुड वर्सेज प्रीटी दिल है दीवाना’ हे नवे गाणे १७ एप्रिलला रिलीज होत आहे. या गाण्यात अर्जुनसह रकुलप्रीत सिंह झळकणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -