घरमनोरंजनइंजिनिअर्सना टक्कर देणे पडलं महागात, 'या' अभिनेत्रीचा पर्सनल नंबर लीक करणारी वेबसाईटच...

इंजिनिअर्सना टक्कर देणे पडलं महागात, ‘या’ अभिनेत्रीचा पर्सनल नंबर लीक करणारी वेबसाईटच बंद पाडली

Subscribe

आतापर्यंत १०० हून अधिक अभिनेत्रींचे पर्सनल नंबर या वेबसाईटने लीक केले होते.

सध्या हॅकिंगचे प्रमाण वाढले आहे. अभिनेत्रींचे पर्सनल नंबर हॅक करुन त्यांना त्रास देणे त्याचप्रमाणे सोशल मीडिया अकाऊंट हॅक करणे असे अनेक प्रकार सध्या अनेक कलाकरांसोबत घडत आहेत. बिग बॉस फेम रुबीना दिलेक सोबतही असाच प्रकार घडला आहे. रुबीनाचा पर्सनल नंबर एक वेबसाईटने लीक केला. त्यानंतर रुबीनाला अनेक अनोळखी लोकांचे फोन आणि मेसेज येणे सुरु झाले. रुबीना आणि तिचा पती अभिनव शुक्ला यांनी नुकतेच बिग बॉस गाजवले होते. त्यामुळे रुबीनाही चांगलीच प्रसिद्ध झाली होती. याचाच फायदा घेऊन एका वेबसाईटने रुबीनाचा नंबर लीक केला. ही माहिती रुबीनाचा पती अभिनेता अभिनव शुक्ला याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

- Advertisement -

आपला पर्सनल नंबर लीक झाल्याचे रुबीनाच्या लक्षात येताच तिने तिच्या पतीलाची याची कल्पना दिली. अभिनवने त्याच्या इंजिरिअर्स मित्रांची मदत घेऊन थेट नंबर लीक करणारी वेबसाईटच बंद पाडली. याविषयी ट्विट करत अभिनवने असे म्हटले आहे की, ‘अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींचे पर्सनल नंबर लीक करणाऱ्यारी वेबसाईट आम्ही बंद पाडली. मला माझ्या इंजिनिअर्स मित्रांनी खुप मदत केली. इंजिनिअर्सना टक्कर देणे महागात पडू शकतं’, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

जेव्हा रुबीनाचा पर्सनल नंबर लीक झाला तेव्हा तिला अनेक अनोळखी लोकांचे फोन मेसेज येऊ लागले. मी त्वरित माझ्या इंजिनिअर्स मित्रांची मदत घेतली. आम्ही मिळून केवळ ३ दिवसात ती वेबसाईट बंद पाडली. आतापर्यंत १०० हून अधिक अभिनेत्रींचे पर्सनल नंबर या वेबसाईटने लीक केले होते. पुन्हा अशी वेबसाईट ओपेन केली तर क्राईम ब्रांचला कळवू असे अभिनवने एका मुलाखतीत सांगितले.


हेही वाचा – सचिन खेडेकर यांनी ‘ताऱ्यांचे बेट’चित्रपटच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त शेअर केला एक दिलखुलास व्हिडिओ
Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -