घरमुंबईmaharashtra curfew 2021 : मुंबईकरांना कडक निर्बंधांचे आवाहन करत, पोलीस आयुक्तच उतरले...

maharashtra curfew 2021 : मुंबईकरांना कडक निर्बंधांचे आवाहन करत, पोलीस आयुक्तच उतरले रस्त्यावर

Subscribe

मुंबईतील मरीन ड्राईव्ह भागात आज पोलीस आयुक्त हेमंत नगराळे लॉकडाऊनच्या अंमलबजावणी होते की नाही याची पाहणी केली.

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मुंबईत इतर राज्यांच्या तुलनेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याने पालिका, आरोग्य आणि पोलीस प्रशासन रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कंबर कसत आहेत. दरम्यान आज लॉकडाउन नियमांचे कडक अंमलबजावणी पाहण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी त्यांनी मुंबईकरांना कडक निर्बंधाचे पालन करा असा आवाहन केले आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह या भागात आज पोलीस आयुक्त हेमंत नगराळे लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी होत आहे की नाही, नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत तर नाही न याची पाहणी केली.

यावेळी बोलताना नगराळे म्हणाले, ”नागरिकांवर पूर्ण विश्वास ठेवतोय, शासनाने सांगून दिलेल्या सुचनांप्रमाणे, नागरिकांनी घरीच राहावे, परंतु अत्यंत आवश्यक कारणासाठी म्हणजे वैद्यकीय, खाजगी, कौटुंबिक आणि बाजारातून काही खाण्यापिण्याच्या वस्तू आणण्यासाठीच घराबाहेर पडावे. अन्यथा दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये. अशी सर्व मुंबईकरांना सुचना आहे.”

- Advertisement -

”मुंबईच्या रस्त्यावरील ट्राफिक कमी आहे परंतु तरीही अनेक वाहनांना थांबवून चौकशी केली जात आहे. तसेच अनावश्यक कारणासाठी फिरणाऱ्या मुंबईकरांना समज दिला जातोय. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनीही सुचना आहेत त्यांनी नागरिकांशी चांगल्या पद्धतीने बोलावे, वागावे तसेच कोणत्याही प्रकारे शिवीगाळ किंवा बळाचा वापर न करता सौजन्याने वागावे.” असे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -