घरमुंबईमेवा लुबाडण्यार्‍यांनी सरकारवर टीका करू नये ; विनायक राऊत यांचा राणेंवर पलटवार

मेवा लुबाडण्यार्‍यांनी सरकारवर टीका करू नये ; विनायक राऊत यांचा राणेंवर पलटवार

Subscribe

भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री अनिल परब यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेना खासदार तथा सचिव विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.

संपूर्ण राजकीय आयुष्यात मेवा लुबाडणार्‍या नारायण राणेंनी अनिल परब किंवा महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचे धारीष्ठ करू नये, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा राणेंवर पलटवार केला.

भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री अनिल परब यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेना खासदार तथा सचिव विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. नारायण राणेंच्या विरूद्ध आमच्याकडे अनेक पुरावे आहेत. उद्योगमंत्री असताना त्यांनी अनेक जमिनी हडप केल्या. वन विभाग, एमआयडीसीच्या अनेक जमिनी हडप केल्याची अनेक प्रकरणे आज सुद्धा बाहेर येत आहेत. त्यामुळे ज्यांचे आयुष्यच लुबाडणुकीत गेले त्यांनी अनिल परब यांना शहाणपणा शिकवण्याची गरज नाही.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत संयमाने आणि तेवढ्याच निर्धाराने महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात ठेवण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे शिस्तीच आणि कोरोना नियंत्रित ठेवण्याचे पूर्णपणे पालन केले जात आहे. मात्र ज्यांना काविळ झालेली त्यांना सगळेच पिवळे दिसते आहे. नारायण राणे हे सत्तेच्या खुर्चीसाठी झपाटलेले गृहस्थ आहेत. खुर्ची मिळत नाही म्हणून तो वेडापिसा झाला आहे, त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तो गरळ ओकत असल्याची टीका विनायक राऊत यांनी केली.

मेवा लुबाडण्यार्‍यांनी सरकारवर टीका करू नये ; विनायक राऊत यांचा राणेंवर पलटवार
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -