घरमहाराष्ट्रमध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांचा धावण्याच्या कालावधीचा विस्तार

मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांचा धावण्याच्या कालावधीचा विस्तार

Subscribe

मध्य रेल्वेच्या साप्ताहिक विशेष ट्रेनचे नियोजन केले आहे.

मध्य रेल्वेच्या साप्ताहिक विशेष ट्रेनचे नियोजन केले आहे. साईनगर शिर्डी ते म्हैसूर विशेष ट्रेन त्याचप्रमाणे मुंबई ते रक्सेल दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या.

 

साईनगर शिर्डी ते म्हैसूर दरम्यान विशेष ट्रेन

- Advertisement -

०६२३७ विशेष दि. १९ एप्रिल २०२१ ते २८ जून २०२१ पर्यंत दर सोमवारी म्हैसूर येथून ०५.३० वाजता सुटेल आणि साईनगर शिर्डी येथे दुसर्‍या दिवशी ११.२५ वाजता पोहोचेल.०६२३८ विशेष दि. २० एप्रिल २०२१ ते २९ जून २०२१ पर्यंत दर मंगळवारी साईनगर शिर्डी येथून २३.५५ वाजता सुटेल आणि म्हैसूर येथे तिसर्‍या दिवशी ०४.२५ वाजता पोहोचेल. मंड्या, केंगेरि, केएसआर बेंगळुरू जंक्शन, यशवंतपूर, तुमकूर, अरसीकेरे, बिरूर, चिक्कजाजूर, चित्रदुर्ग, रायदुर्ग, बल्लारी जं., होसपेटे जं., कोप्पल, गदग जं., बदामी, बागलकोट, विजापूर, सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूर या स्थानकावर थाबतील. यासोबतच  १ प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, २ द्वितीय आसन श्रेणी, १ पेंट्री कार. अशी संरचना करण्यात आली आहे. संपूर्णतः राखीव असलेल्या ०६२३८ या विशेष ट्रेनचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. २० एप्रिल २०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

मुंबई आणि रक्सौल दरम्यान विशेष ट्रेन

- Advertisement -

०१३२१ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस २१ एप्रिल २०२१ रोजी २१.१५ वाजता सुटेल आणि रक्सौल येथे तिसर्‍या दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल. ०१३२२ विशेष रक्सौल येथून दि. २४ एप्रिल २०२१ रोजी १४.०० वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसर्‍या दिवशी १७.०० वाजता पोहोचेल. ठाणे, भिवंडी रोड, वसई रोड, सूरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, बयाना, आग्रा फोर्ट, टुण्डला जंक्शन, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, गोंडा, बस्ती, गोरखपूर, पनियहवा, नरकटियागंज जंक्शन., बेतिया. या स्थानकांवर थांबेल. २१ द्वितीय आसन श्रेणी. अशी या ट्रेनची संरचना करण्यात आलीआहे.  संपूर्णतः आरक्षित ०१३२१ या विशेष ट्रेनचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. २० एप्रिल २०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्र आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

या विशेष ट्रेनच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.

केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -