घरमुंबईCorona Vaccination : मुंबईतील प्रत्येक वार्डात लसीकरण केंद्र सुरू करा; आदित्य ठाकरे...

Corona Vaccination : मुंबईतील प्रत्येक वार्डात लसीकरण केंद्र सुरू करा; आदित्य ठाकरे यांचे आदेश

Subscribe

मुंबईतील लोकसंख्येचा विचार करता आणि कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेच्या सर्व २२७ वार्डात लसीकरण केंद्रे लवकरात लवकर सुरू करावीत, असे आदेश आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनास दिले आहेत.

मुंबई शहर आणि उपनगरे येथील पालिकेच्या सर्व २२७ वार्डात लसीकरण केंद्रे सुरू करावीत, असे आदेश पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका यंत्रणेला दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस देण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. मुंबईत सध्या पालिकेची ३९ आणि खासगी ७१ अशी एकूण १४० लसीकरण केंद्रे आहेत. मात्र, मुंबईत लसीकरण केंद्रांची सध्याची संख्या ही अपुरी पडत असल्याने प्रत्येक वार्डात लसीकरण केंद्र सुरु करणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे यांना वाटते.

शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांच्या प्रयत्नाने एक्वर्थ कुष्ठरोग रूग्णालयात नव्याने निर्माण केलेल्या लसीकरण केंद्राचे लोकार्पण बुधवारी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरूपात, तर महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते प्रत्यक्ष स्वरूपात करण्यात आले आहे. मुंबईतील लोकसंख्येचा विचार करता आणि कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेच्या सर्व २२७ वार्डात लसीकरण केंद्रे लवकरात लवकर सुरू करावीत, असे आदेश आदित्य ठाकरे यांनी यावेळी पालिका प्रशासनास दिले आहेत.

- Advertisement -
mayor kishori pednekar
एक्वर्थ कुष्ठरोग रूग्णालयात नव्याने निर्माण केलेल्या लसीकरण केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरूपात, तर महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते प्रत्यक्ष करण्यात आले

याप्रसंगी, शिवसेनेचे स्थानिक खासदार राहुल शेवाळे, ‘एफ/ दक्षिण’ आणि ‘एफ उत्तर’ प्रभाग समितीचे अध्यक्ष रामदास कांबळे, स्थानिक नगरसेवक अमेय घोले, उपायुक्त (परिमंडळ २) विजय बालमवार, ‘एफ /दक्षिण’ विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -