घरक्रीडाजपान ओपन स्पर्धा : किदम्बी श्रीकांत स्पर्धेतून बाहेर

जपान ओपन स्पर्धा : किदम्बी श्रीकांत स्पर्धेतून बाहेर

Subscribe

याआधीच पी.व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय यांच्या बाहेर गेल्यानंतर आता किदम्बी श्रीकांतच्या स्पर्धेबाहेर जाण्याने भारताचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.

भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या बाहेर गेला असून त्याच्या स्पर्धेबाहेर जाण्याने आता भारताचे आव्हानही संपुष्टात आले आहे. पी. व्ही. सिंधूच्या स्पर्धेबाहेर गेल्यानंतर सर्व भारतीयांच्या आशा या एच.एस. प्रणॉय आणि किदम्बी श्रीकांतवर होत्या मात्र आधी प्रणॉयच्या आणि आता श्रीकांतच्या स्पर्धेबाहेर जाण्याने भारतीय चाहते निराश झाले आहेत. सुरूवातीपासून चांगली कामगिरी करणाऱ्या श्रीकांतला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या ली डाँग केउनकडूने पराभूत केले आहे.

वाचा – जपान ओपन स्पर्धा : पी.व्ही. सिंधू स्पर्धेमधून बाहेर

असा झाला सामना

सामन्याच्या सुरूवातीपासूनच दोन्ही खेळाडू एकमेंकावर चढाई करताना दिसून येत होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात पहिला सेटमध्ये जबरदस्त खेळ दाखवत २१-१९ च्या फरकाने सेट आपल्या नावे केला. त्यानंतर मात्र दुसऱ्या सेटमध्ये डाँगने चोख प्रत्युत्तर देत २१-१६ च्या चांगल्या फरकाने सेट आपल्या नावे करत सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर अखेरच्या तिसऱ्या सेटमध्ये विजयासाठी दोन्ही खेळाडूंनी प्रयत्नांची पराकाष्टा करत खेळ उंचावण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर कोरियाच्या डाँगने २१-१८ च्या फरकाने सेट जिंकत सामना आपल्या नावे केला या विजयाबरोबरच डाँगने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

- Advertisement -

एच एस प्रणॉय राउंड १६ मधूनच बाहेर

दुसरीकडे भारताचा बॅडमिंटनपटू एच एस प्रणॉय देखील राउंड १६ मध्ये पराभूत झाला असून त्याला इंडोनेशियाच्या अँथनी सिनीसकाने पराभूत करत स्पर्धेबाहेर केले आहे. अँथनीने २१-१४ आणि २१-१७ अशा सरळ सेट्समध्ये प्रणॉयला मात देत स्पर्धेबाहेर केले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -