घरताज्या घडामोडीMetro 3 - कफ परेड ते CSMTपर्यंत डाऊनलाईनचे काम पूर्ण, भुयारीकरणाचा ३७वा...

Metro 3 – कफ परेड ते CSMTपर्यंत डाऊनलाईनचे काम पूर्ण, भुयारीकरणाचा ३७वा टप्पा पूर्ण

Subscribe

ऐतिहासिक वारसा इमारती जवळील मेट्रो-३च्या पॅकेज-१चे ९६ टक्के भुयारीकरण मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (मुं.मे.रे.कॉ) पूर्ण करण्यात आले. आज या पॅकेज अंतर्गत भुयारीकरणाचा ३७वा टप्पा यशस्वीरीत्या पार पडला. हुतात्मा चौक ते सीएसएमटी हा डाऊन लाईन मार्गाचा ५६९ मी. भुयारीकरणाचा टप्पा एकूण ४१८ रिंग्जच्या सहाय्याने १०६ दिवसात पूर्ण झाला. या भुयारीकरणासह पॅकेज-१ मधील कफ परेड ते सीएसएमटी दरम्यान एकूण २.९ किमी लांबीचे डाऊन लाईनचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

सूर्या-२ या रॉबिन्स बनावटीच्या ड्युएल-मोड हार्ड-रोक टनेल बोअरिंग मशीनद्वारे हे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले आहे. मुं.मे.रे.कॉचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘ऐतिहासिक वारसा इमारती आणि समुद्र नजीक भुयारीकरण करणे जिकिरीचे आहे. मात्र आमच्या अभियंत्यांच्या आणि कामगारांची उत्कृष्ट टीम हे शिवधनुष्य लीलया पेलत आहे. मला आनंद वाटतो की, ऐतिहासिक वारसा इमारती जवळून भुयारीकरण करताना सर्व सुरक्षेविषयी दक्षता घेत पॅकेज-१चे आतापर्यंत ९६ टक्के भुयारीकरण पूर्ण झाले.’

- Advertisement -

पॅकेज-१ अंतर्गत कफ परेड, विधान भवन, चर्चगेट आणि हुतात्मा चौक या मेट्रो स्थानकांचा समावेश असून आतापर्यंत या पॅकेज अंतर्गत सहा भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण झाले. पॅकेज-१ च्या भुयारीकरणाचा तपशील पुढील प्रमाणे…

१) कफ परेड ते विधान भवन (अप लाईन १२२८ मी, डाऊन लाईन १२५४ मी)

- Advertisement -

२) विधान भवन ते चर्चगेट अप लाईन ४९८ मी, डाऊन लाईन ४८१ मी)

३) चर्चगेट ते हुतात्मा चौक (अप लाईन ६५४ मी)

४) हुतात्मा चौक ते सीएसएमटीअप लाईन (डाऊन लाईन ५६९मी)

मेट्रो-३ प्रकल्पासाठी एकूण आतापर्यंत ९५ टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे.


हेही वाचा – Oxygen Man Shahnawaz Shaikh: २३ लाखांची कार विकली अन् ४ हजार कोरोना रूग्णांना दिला ऑक्सिजन सपोर्ट


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -